40 कोटींच्या संपत्तीचा मोह, बापलेकीने आईला संपवलं, हायप्रोफाईल मर्डर केसचा तीन दिवसात छडा

अर्चना रेड्डी यांची संपत्ती मिळवण्यासाठी बाप-लेकीने तिची हत्या करण्याचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रारीच्या आधारे तपास केल्याचे पोलिसांनी सांगितले.

40 कोटींच्या संपत्तीचा मोह, बापलेकीने आईला संपवलं, हायप्रोफाईल मर्डर केसचा तीन दिवसात छडा
अर्चना रेड्डी हत्या प्रकरण
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 10:21 AM

बंगळुरु : कर्नाटकातील महिलेच्या हत्या प्रकरणाचा (Karnataka Lady Murder Case) उलगडा करण्यात पोलिसांना तीनच दिवसात यश आलं आहे. या प्रकरणी सात आरोपींना अटक झाली असून त्यामध्ये मृत महिलेचा पती आणि तिच्या मुलीचाही समावेश आहे. 27 डिसेंबरच्या रात्री अर्चना रेड्डी (Archana Reddy) नावाच्या महिलेची कर्नाटकात हत्या करण्यात आली होती. या हत्येमागील खरं कारण म्हणजे तिची 40 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं बोललं जातं. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

काय आहे प्रकरण?

अर्चना रेड्डी यांची संपत्ती मिळवण्यासाठी बाप-लेकीने तिची हत्या करण्याचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रारीच्या आधारे तपास केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिलेचा पती नवीन रेड्डी याने पाच सशस्त्र हल्लेखोरांसह पत्नीवर चाकूने वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

अनैतिक संबंधांचा संशय

पती नवीन अर्चना रेड्डीवर चाकूने वार करत असताना सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. त्याच्याशिवाय पाच जण हल्ला करत असल्याचंही दिसत आहे. नवीनच्या अनैतिक संबंधांची कुणकुण अर्चना यांना लागली होती. तर अर्चना यांचेही विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय नवीनला होता. या कारणावरुन दोघांमध्ये वारंवार खटके उडत असत.

40 कोटींच्या संपत्तीपायी आईची हत्या

डीसीपी श्रीनाथ एम जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चनाचा पती नवीन कुमार, त्याचा साथीदार संतोष आणि अन्य पाच जणांना पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर अटक केली आहे. नवीनची मुलगीही या प्रकरणात संशयित आहे. अर्चना रेड्डींची 40 कोटी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी बापलेकीने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

संबंधित बातम्या :

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन अश्लील वर्तन, वसईत टवाळखोराला स्थानिकांनी चोपला

किरकोळ वादातून फळ विक्रेत्याची हत्या; फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध

MBBS च्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, आई-वडिलांच्या नावे सुसाईड नोट

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.