AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MBBS च्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, आई-वडिलांच्या नावे सुसाईड नोट

19 वर्षीय दिव्या यादव ही दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. गुरुवारी ती कॉलेजमधील संजीवनी या मुलींच्या जुन्या वसतिगृहातील खोली क्रमांक 64 मध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

MBBS च्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, आई-वडिलांच्या नावे सुसाईड नोट
दिल्लीत एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली : दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये (MAMC) एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेत नापास झाल्यामुळे तरुणी नैराश्यात असल्याचं बोललं जातं. त्यामुळेच तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय दिव्या यादव ही दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. गुरुवारी ती कॉलेजमधील संजीवनी या मुलींच्या जुन्या वसतिगृहातील खोली क्रमांक 64 मध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. वसतिगृहाची ही खोली रिकामी असायची.

खोली आतून बंद असल्याने वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. मात्र, तोपर्यंत दिव्याचा मृत्यू झाला होता. ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिचा मृतदेह फासावरुन बाहेर काढला आणि पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

परीक्षेत नापास झाल्याने तणावात

चौकशीदरम्यान, दिव्याच्या रुम पार्टनर्सकडून माहिती मिळाली की दिव्या नुकत्याच झालेल्या दोन पेपरमध्ये नापास झाली होती. 29 डिसेंबरला संध्याकाळी निकाल जाहीर झाला, तेव्हापासून ती निराशेत होती.

कुटुंबीयांच्या नावे सुसाईड नोट

या प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांना दिव्याच्या रजिस्टरमधून एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. ही चिठ्ठी तिने आपल्या कुटुंबासाठी लिहिली होती. फॉरेन्सिक तपासणीत तिचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर दिव्याचे शवविच्छेदन करून मृतदेह तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर पुण्यात जमावाचा हल्ला; पोलिसांचा हवेत गोळीबार

बहिणीच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या; भर बाजारात केले वार

कोंबडा न दिल्याच्या रागातून व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या; जमावावर अंदाधुंद गोळीबार

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.