AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर, पुरावे मिटवण्याचे आयते कोलीत

आता व्हॉट्सअ‍ॅपने नुकतंच 'फोटो सेट टू सी वन्स' हे नवीन फिचर लॉंच केलं आहे. या नवीन फीचरमुळे एखाद्या व्यक्तीने पाठवलेला फोटो-व्हिडीओ, आपण फक्त एकदा बघू शकतो. त्यानंतर तो फोटो -व्हिडीओ गायब होतो.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर, पुरावे मिटवण्याचे आयते कोलीत
WhatsaApp
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 27, 2021 | 12:26 PM
Share

नागपूर : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या सात वर्षांत राज्यात 23 हजारपेक्षा जास्त सायबर गुन्हे घडले, पण शिक्षा केवळ 99 आरोपींनाच झालीय. एकट्या नागपूर शहरात वर्षभरात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत 104 टक्के वाढ झालीय. अशातच व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर सायबर गुन्हेगारांच्या हातात आयते कोलीत देणारे ठरत आहे.

काय आहे व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर? 

आता व्हॉट्सअ‍ॅपने नुकतंच ‘फोटो सेट टू सी वन्स’ हे नवीन फिचर लॉंच केलं आहे. या नवीन फीचरमुळे एखाद्या व्यक्तीने पाठवलेला फोटो-व्हिडीओ, आपण फक्त एकदा बघू शकतो. त्यानंतर तो फोटो -व्हिडीओ गायब होतो. म्हणजेच आपल्याला तो फोटो-व्हिडीओ परत बघता येत नाही. पण या नव्या फीचरमुळे अट्टल गुन्हेगारांकडून सायबर गुन्हा करुन पुरावा नष्ट करण्याची भीती सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केली आहे.

सायबर गुन्हे दरात नागपूरचा आठवा क्रमांक

देशभरात सध्या 53 कोटी युजर्स व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. ज्या वेगाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहेत, त्याच वेगाने सायबर गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे. एकट्या नागपूर शहरात वर्षभरात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत 104 टक्के वाढ झाली आहे. सायबर गुन्हे दरात देशात नागपूरचा आठवा क्रमांक लागतो.

गुन्हे करुन पुरावे मिटवण्याचं साधन

नवनवे फीचर वापरुन हे गुन्हेगार गुन्हे करतात आणि प्रबळ पुराव्यांअभावी कायद्याच्या कचाट्यातून सुटतात, आणि पुन्हा गुन्हे करायला मोकाट असतात. अशाच गुन्हेगारांसाठी व्हॉट्सअॅपचे ‘फोटो सेट टू सी वन्स’ हे फिचर गुन्हे करुन पुरावे मिटवण्याचं साधन ठरु शकते. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या प्रत्येकाने सावध राहण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

WhatsApp new feature

WhatsApp new feature

नागपूरच्या गुन्हेगारीची राष्ट्रीय स्तरावर ओळख

दरम्यान, वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागपूरने गुन्हे क्षेत्रात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या क्षेत्रात आता राज्यातील इतर शहरांसोबत तुलनाच होऊ शकत नसल्याने नागपूर शहराने आपली वाटचाल राष्ट्रीय पातळीवर सुरु केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारी वरून हे स्पष्ट झाले आहे.

पुणे-मुंबई कितव्या स्थानी?

नागपूर शहरात वर्षाकाठी सरासरी शंभर खुनाच्या घटना घडतात. गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटणा, लखनौ आणि दिल्लीसारख्या शहरांशी नागपूरची बरोबरी होत आहे. राज्यातील पुणे दहाव्या स्थानावर, तर मुंबई 16 व्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे आता नागपूर शहरात कायद्याचे राज्य आहे, की गुन्हेगारांचे? या प्रश्नाचे उत्तर नागपूर पोलिसांनी द्यायलाच हवे.

यूपी-बिहार-दिल्लीलाही मागे सोडले

नागपूर शहर गंभीर गुन्ह्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. नागपूरकर जनतेसाठी आणि पोलीस यंत्रणेसाठी ही काही गौरवाची बाब नाही. मात्र आता नागपूरने गुन्ह्यांच्या बाबतीत देश पातळीवर गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बिहार राज्यातील पाटणा, उत्तर प्रदेशमधील लखनौ आणि दिल्ली सारख्या शहरांना मागे टाकत असल्याचे आकडे समोर आल्याने गृहमंत्रालासह पोलिसांची चिंता देखील वाढली आहे.

नागपूर शहराच्या हद्दवाढीचा रेकॉर्डमध्ये विचार नाही

या संदर्भात शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे वेगळेच तर्क आहेत. त्यांच्या मते नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे नागपूर शहराची लोकसंख्या 25 लाख असल्याची नोंद आहे, मात्र नागपूर शहराचा विस्तार झाला आहे. ग्रामीण नागपूरच्या अनेक भागांचा नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत समावेश झालेला आहे, त्यामुळे दर एक लाख लोकसंख्येमागे हत्या प्रकरणात नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर दाखवत असले, तरी पोलीस आयुक्तालयाचा झालेल्या विस्तराचा यामध्ये विचार करण्यात आलेला नसल्याचं ते सांगतात.

नागपूरने यंदा पाटण्यालाही मागे टाकले

नागपुरात हत्या प्रकरणाचा दर 3.9 टक्के आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2020 वर्षाच्या गुन्हे विषयक अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे नागपुरात हत्येच्या प्रकरणांचा दर 3.9 टक्के एवढा असून हा देशात सर्वाधिक आहे. या अहवालानुसार 2020 मध्ये बिहारची राजधानी पाटणामध्ये हत्येची 79 प्रकरणं नोंदवली गेली असून दर एक लाख लोकसंख्येच्या प्रमाणे पाटण्यात हत्येचा दर 3.85 आहे. म्हणजेच दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणासंदर्भात नागपूरने यंदा पाटण्याला ही मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी यासंदर्भात नागपूरचे स्थान पाटण्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी 2019 मध्ये नागपुरात हाच दर 3.6 टक्के होता, तर पाटण्यात तो 4.9 टक्के एवढा होता. म्हणजेच दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात पाटण्याची स्थिती सुधारली आहे तर नागपुरात स्थिती आणखी बिघडली आहे.

नागपूर शहरात वीस वर्षात 2022 खुनाच्या घटना झाल्या आहेत, त्यानुसार वर्षाकाठी शंभर खून होतात. ही संख्या वाढलेली आहे ही वस्तुस्थिती आहे, मात्र ही आकडेवारी आज वाढलेली नाही. नागपुरात वर्ष 2020 मध्ये हत्येची 97 प्रकरणं नोंदवली गेली होती. त्यामुळे आता याकडे लक्ष देऊन गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याची गरज व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात गुन्हेगारीचा सुळसुळाट, हत्या प्रकरणात देशात अव्वल, पाटणा-लखनौ-दिल्लीलाही मागे टाकले

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल