AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या डॉ. मनिषा जेजुरकर यांचा मृत्यू, पतीचे विवाहबाह्य संबंध जबाबदार?, फरार पती आणि मैत्रिणीला अटक

नाशिक येथील डॉ.मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांचे पती डॉ.निलेश जेजुरकर आणि मैत्रीण डॉ. स्वाती चव्हाण यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या डॉ. मनिषा जेजुरकर यांचा मृत्यू, पतीचे विवाहबाह्य संबंध जबाबदार?, फरार पती आणि मैत्रिणीला अटक
Doctor manisha Jejurkar Murder
| Updated on: Sep 21, 2026 | 5:36 PM
Share

नाशिकमधील बहुचर्चित डॉ.मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहेत. 6 मार्च रोजी डॉ. मनीषा यांचा राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. मात्र, घराच्या खिडकीला गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने ही आत्महत्या आहे की घातपात या संदर्भात संशय निर्माण झाला होता. मयत मनिषा यांच्या पतीनंतर डॉ.निलेश यांची मैत्रीण जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण हिला पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणाला वेगळच वळण मिळाले आहे.पाहुयात या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

डॉ. निलेश जेजुरकर यांना अटक केल्यानंतर पोलीस चौकशीत डॉ. स्वाती चव्हाण यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची कबूल दिल्याने स्वाती चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत डॉ. मनीषा यांच्या माहेरच्यांकडून तिचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निलेश जेजुरकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र याप्रकरणी निलेश जेजुरकर फरार होत त्यांनी नाशिक सत्र न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जामीनासाठी धाव घेतली आहे.हायकोर्टाने त्यांचा जामीन नामंजूर केला आणि पोलिसांना शरण जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या सगळ्या प्रकरणात निलेश जेजुरकर यांना पोलिसांनी अटक केली आणि निलेश जेजुरकर यांच्या अटकेनंतर डॉक्टर स्वाती चव्हाण यांना अटक केल्याने या प्रकरणाला एक वेगळं मिळाल आहे. आता न्यायालयाने स्वाती चव्हाण याला एक दिवसांची पोलीस कोठडी दिली असून उद्यापर्यंत निलेश जेजुरकर आणि स्वाती चव्हाण या दोघांचीही चौकशी केली जाणार आहे.

मार्च महिन्यामध्ये ही घटना घडल्यानंतर या प्रकरणात डॉक्टर मनीषा जेजुरकर या खूप चर्चेत असलेल्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आणि या प्रकरणी पोलिसांकडून या दोघांना अटक करत स्वाती चव्हाण यांचा मोबाईल ही जप्त केला.डॉक्टर स्वाती आणि डॉक्टर निलेश यांच्यात प्रेम संबंध असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र, या सगळ्या प्रकरणात सलग नऊ वेळा डॉक्टर स्वाती यांची पोलिसांनी चौकशी केली होती. आता पुन्हा या सगळ्या प्रकरणांमध्ये कोणताही ठोस पुरावा नसल्याचा युक्तीवाद डॉक्टर स्वाती चव्हाण यांच्या वकिलांनी केला होता.

डॉ. मनीषा जेजुरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचे पती निलेश जेजुरकर यांना पोलिसांनी अटक केली होती आणि पोलिसांच्या चौकशीत डॉक्टर स्वाती चव्हाण यांच्यासोबत प्रेम संबंध असल्याची कबुली डॉक्टर निलेश यांनी पोलिसांना दिली. मात्र, या सगळ्या प्रकरणांमध्ये तू तुझ्या नवऱ्याला आवडत नाही, तुझं शिक्षण कमी आहे असे बोलून डॉक्टर स्वाती या डॉक्टर मनीषा जेजुरकर यांना टॉर्चर करत होत्या आणि याच छळातून त्यांनी आत्महत्या केलाचा आरोप कुटुंबाने केला आहे. दरम्यान, बहीण दुसऱ्या दिवशी साडी घेणार होती. पेशंटला वेळ दिलेली होती, ती कस काय आत्महत्या करू शकते असा सवाल डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या बहिणीने केला आहे.

डॉक्टर निलेश यांचे डॉक्टर मनीषा यांच्यासोबत कोणत्या कारणावरून वाद होत होते. यासंदर्भात तपास केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर स्वाती ही आत्महत्याच्या दरम्यान घटनास्थळावर नेमकी काय करत होती आणि तिचे डॉक्टर मनीषा यांच्याशी नेमके काय संबंध होते आणि कोणत्या कारणासाठी ती वारंवार छळ करत होती या सगळ्या कुटुंबानी केलेल्या आरोपांचा पोलीस तपासातून खुलासा होणार आहे.

Follow Us
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
Shiv Sena Symbol : मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह... धनुष्यबाणाच्या वादावर संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा, पुढे म्हणाले...
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...
Eco Friendly Ganeshotsav : DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम काय म्हणाले?
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी
Video : 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले...
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...
Mumbai Coastal Road crash : कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी पण त्याच्या BMW कारचा..
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन