किरकोळ वादातून फळ विक्रेत्याची हत्या; फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध

नाशिकच्या येवल्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच शुल्लक कारणावरून मित्राची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

किरकोळ वादातून फळ विक्रेत्याची हत्या; फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 9:23 AM

नाशिक: नाशिकच्या येवल्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच शुल्लक कारणावरून मित्राची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मनोज कुमार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा शहरात फळ विक्रीचा व्यवसाय होता.

रागाच्या भरात चाकू हल्ला

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज कुमार आणि आरोपी अशा दोघांचाही फळ विक्रीचा व्यवसाय होता. ते रात्रीच्या सुमारास दारू पिले. दारू पिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वाद झाल्याने रागाच्या भरात आरोपीने मनोज कुमार याच्यावर चाकून वार केले. वार केल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

उपचारादरम्यान मृत्यू

दरम्यान ही घटना स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी मनोज कुमार यांना उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू  झाला. दरम्यान या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

MBBS च्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, आई-वडिलांच्या नावे सुसाईड नोट

धक्कादायक! सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर पुण्यात जमावाचा हल्ला; पोलिसांचा हवेत गोळीबार

Ulhasnagar : उल्हासनगरचा ‘चांदनी डान्सबार’ अखेर सील, आतापर्यंत तब्बल 80 वेळा झाली होती कारवाई

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us