Missing Girl : बोरिवली येथून हरवलेली मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानकात सापडली, पोलिसांनी पालकांकडे केले सुपूर्द

| Updated on: Mar 05, 2022 | 6:47 PM

रेल्वे पोलीस ठाणे बोरीवली येथील महिला पोलिस कॉन्स्टेबल सुषमा जाधव व बालिकेचे वडील किरण जगताप यांच्या ताब्यात दिले. पोलिस हवालदार साळेकर, पोलिस हवालदार गवारगुरु, पोलिस हवालदार भालेराव, पोलिस कॉन्स्टेबल पाटील, मपोकॉ मारबदे, पोलिस कॉन्स्टेबल निचत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

Missing Girl : बोरिवली येथून हरवलेली मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानकात सापडली, पोलिसांनी पालकांकडे केले सुपूर्द
बोरिवली येथून हरवलेली मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानकात सापडली
Follow us on

नाशिक / शैलेश पुरोहित (इगतपुरी प्रतिनिधी) : मुंबईतील बोरिवली येथील चुकलेली 12 वर्षाची मुलगी इगतपुरी रेल्वे स्टेशन (Igatpuri Railway Station)वर पोहचली. त्यानंतर इगतपुरी रेल्वे पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेत तिची विचारपूस केली. यानंतर बोरिवली येथून चुकलेल्या 12 वर्षीय मुलीला तिच्या पालकां (Parents)च्या स्वाधीन करण्यात आले आहे. इगतपुरी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने मुलीला पालकांच्या ताब्यात दिल्याने पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक काजवे, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. भाईक, पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. (The missing girl from Borivali was found at Igatpuri railway station)

आपण चुकून इगतपुरी रेल्वे स्थानकात आल्याचे मुलीने सांगितले

इगतपुरी येथे कर्तव्यावर हजर असलेले पोलीस हवालदार साळेकर, गवारगुरु, पाटील यांना 12 वर्षाची एक मुलगी रेल्वे स्टेशन इगतपुरी येथे प्लॅटफॉर्म क्र. 2 वर एकटी विनापालक दिसून आली. त्यावरून तिला इथे येण्याचे कारण विचारले असता तिने समाधानकारक सांगितले नाही. त्यामुळे तिला तिची काळजी व संरक्षणासाठी रेल्वे पोलीस ठाणे इगतपुरी येथे नेण्यात आले. पोलिस ठाण्यात आणून तिची विचारणा केली असता तिने आपले नाव पोलिसांना सांगून ती मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी असल्याची माहिती दिली. रेल्वेमधून चुकून इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे आल्याचे तिने सांगितले. त्यानुसार रेल्वे पोलिस ठाणे इगतपुरी येथील स्टेशन ड्युटीवर हजर असलेले कर्मचारी यांनी वेळेवर कार्यतत्परता दाखवून तिला पोलिस ठाण्यात आणून पोलिस ठाणे अंमलदार पोलिस हवालदार भालेराव यांनी तिची काळजी संरक्षणासाठी पोलिसाची नेमणूक केली. तिच्या पालकांशी संपर्क साधून तिला त्यांच्या स्वाधीन केले. रेल्वे पोलीस ठाणे बोरीवली येथील महिला पोलिस कॉन्स्टेबल सुषमा जाधव व बालिकेचे वडील किरण जगताप यांच्या ताब्यात दिले. पोलिस हवालदार साळेकर, पोलिस हवालदार गवारगुरु, पोलिस हवालदार भालेराव, पोलिस कॉन्स्टेबल पाटील, मपोकॉ मारबदे, पोलिस कॉन्स्टेबल निचत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

नांदेडमध्ये रस्त्यावरील बालकांचे सर्वेक्षण होणार

नांदेड जिल्ह्यात रस्त्यावर राहणारे अनाथ, बेघर, दिवसभर रस्त्यावर राहून रात्री जवळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि कुटुंबासमवेत रस्त्यावर जी बालके राहतात त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभागाला असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे याचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेद्वारे या मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, या सर्व बालकांची राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (एनसीपीसीआर) या संकेस्थळावर नोंदणी केली जात आहे. त्यामध्ये ही मुले कुठून आली? ज्या कुटुंबासमवेत ती राहत आहेत ते त्यांचेच पालक आहेत का ? बालमजूर म्हणून कार्यरत आहेत का ? काही समाजकंटकाकडून मुलांना भिक मागण्यासाठी ही मुले बाहेरील जिल्ह्यातून किंवा परराज्यातून आणली जातात का ? आदी बाबी तपासल्या जाणार आहेत. (The missing girl from Borivali was found at Igatpuri railway station)

इतर बातम्या

Video: गॅरंटी, असं महाकाय जनावर वळवळत जाताना तुम्ही पाहिलं नसेल, कमजोर दिलवाले ना देखे

Titwala Fighting : किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घातला, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल