AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! नाशिक महानगर पालिकेच्या वेबसाईटवर सायबर हल्ला, हॅकर्सने बघा काय केलंय…

नाशिक महानगर पालिकेच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये वेबसाईट हॅक करून हॅकर्सने केलेल्या कृत्याने खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी ! नाशिक महानगर पालिकेच्या वेबसाईटवर सायबर हल्ला, हॅकर्सने बघा काय केलंय...
Image Credit source: Google
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 21, 2023 | 11:57 AM
Share

नाशिक : नाशिक महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर पुन्हा एकदा सायबर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक महानगर पालिकेच्या वेबसाईटवर यापूर्वीही सायबर हल्ला झाला आहे. खरंतर हॅकर्सकडून नेहमीच बँक, शासकीय संस्था यांच्यावर सायबर हल्ला केला जातो. शासकीय वेबसाईट यांच्यावर हॅकर्स हल्ला करत असतात. त्याचे कारण म्हणजे शासकीय वेबसाईटची नियमित तपासणी होत नाही. फार लक्ष दिले जात नाही. म्हणून हल्ला करणे सहजसोपे असल्याचे समोर आले आहे. नाशिक महानगर पालिकेची अधिकृत वेबसाईट www.nmc.gov.in या साईटवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर हॅकर्सने त्यावर हॅक केल्याची इमेज सुद्धा अपलोड केली आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या वेबसाईटवर हॅकर्सने सायबर हल्ला केल्याचं स्पष्ट झाले आहे. हॅकर्सने यावेळी संपूर्ण डेटा हॅक केल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याने साईट हॅक झाल्याचा फोटो अपलोड केला आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या जाहीर केलेले वृत्त प्रसारण आणि घोषणा करणारा टॅब वर हल्ला झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. यापूर्वीही याच वेबसाईटवर सायबर हल्ला झाला होता. त्यानंतर डेटा चोरीला गेल्याची भीती व्यक्त केली जात होती.

वेबसाईटवर झालेला सायबर हल्ला झाला आहे, असा हल्ला झाला तर तो कशाप्रकारे झाला आहे. हे चेक करणे आणि कोणी, कधी, कशाप्रकारे केला आहे, याचा पुरावा गोळा करणे आणि संबंधितावर कारवाई करणे आवश्यक आहे.

वेबसाईटवर अपलोड केलेली संवेदनशील आणि महत्त्वाची माहितीचा हॅकर्स गैरवापर सुद्धा करू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. वेबसाईटमधील त्रुटी काय आहेत हे नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे.

वेबसाईट सुरक्षित करून घेणे आणि याशिवाय वारंवार वेबसाईट हॅक का केली जात आहे याचेही कारण शोधणे आवश्यक असल्याचे मत सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी व्यक्त केले आहे.

Follow Us
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
मोठी बातमी! दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला, पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी कमानीखाली दबून महिलेने गमावला जीव
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात शिंदे गटातील नेत्याचा राऊतांना खोचक टोला
ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; शाळेतूनच प्रो-गोविंदा...
Dahi Handi in Thane | ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; गोविंदांना शाळेतूनच प्रो-गोविंदा प्रशिक्षण, लक्ष्य थेट...
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी; प्रत्येक कलाकाराचे...
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध