AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime : ऑफीसमधून टॅब चोरी, 200 नको ते व्हिडीओ आणि.. नाशिकमध्ये आणखी एक स्कँडल उघडकीस

नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणापाठोपाठ आणखी एक धक्कादायक 'सेक्स स्कँडल' उघडकीस आले आहे. सातपूर येथील एका व्यावसायिकाचा टॅब चोरी करून त्यातील २०० व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची खंडणी मागण्यात आली. पोलिसांनी खंडणी स्वीकारताना चार संशयितांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, व्यावसायिकावरही संशयाची सुई वळली असून, या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

Nashik Crime : ऑफीसमधून टॅब चोरी, 200 नको ते व्हिडीओ आणि.. नाशिकमध्ये आणखी एक स्कँडल उघडकीस
Nashik Crime News
| Edited By: | Updated on: Apr 03, 2026 | 8:51 AM
Share

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचे कारनामे, महिलांना फसवून केलेला लैंगिक अत्याचर, व्हायरल झालेले व्हिडीओ हे सगळण प्रकरण चर्चेत असतानाच, नाशकमधून आणखी एक सेक्स स्कँडल उघडकीस आलं आहे. मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी एका व्यावसायिकाला देण्यात आली आहे. त्या व्यावसायिकाच्या ऑफीसमधून टॅब चोरी केल्यानंतर, त्यातील नको ते व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देण्यात आल्याचे समजते. यासाठी त्याच्याकडे तब्बल 12 लाख रुपयांचमी मागणी करण्यात आली.  या टॅबमध्ये थोडेथोडके नव्हे तर 200 व्हिडीओ होते, असाही संशय आहे. नाशिक शहरातल्या या धक्कादायक प्रकाराने मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणी पैसे स्वीकारतानाच पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे, तर ज्याने तक्रार केली, त्याच्या दिशेनेही पोलिसांच्या संशयाची सुई वळली आहे. या संपूर्ण प्रकाराने शहर हादरलं असून पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण ?

एकीकडे नाशिकमधल्या भोंदू अशोक खरातचं प्रकरण ताजं असून, एसआयटीकडून संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू असतानाच हा आणखी एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील एक व्यावसायिक आहे, ज्याच्या ऑफीसमधून एक टॅब चोरीला गेला. चार लोकांनी तो टॅब चोरत, त्यामध्ये असलेले व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देत त्यांनी व्यावसायिकाकडे 12 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्या रकमेपैकी 10 हजार रुपये घेत असताना, या 4 संशयितांना नाशिकच्या सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं, अशी माहिती समोर आली आहे. त्या चारही संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशीही करण्यात येत आहे.

मात्र जो स्वत: तक्रारदार आहे, त्या व्यावसायिकावरही पोलिसांना दुसरा संशय आहे. त्यामुळे त्याचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या टॅबमध्ये असलेले शेकडो व्हिडीओ हे व्हायरल करू अशी धमकी देत आरोपींनी त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र या टॅबमध्ये थोडथोडके नव्हे तर तब्बल 200 व्हिडीओ असल्याचं देखील पोलिसांच्या तपासात समोर येऊ लागलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य खूप वाढलं आहे. नाशिकमधील सातपूर पोलीस याप्रकरणाचा तपास करत असून त्यातून आणखी काय महत्वाची, धक्कादायक माहिती समोर येते, ते पाहणं महत्वाचं ठरेल.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त