AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो सतत रिक्षा बदलत होता; अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी कसा लावला अपहरणकर्त्याचा शोध ?

चिमुरडीचे अपहरण केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी हा सतत रिक्षा बदलत होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जवळपास दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले होते. अखेर...

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो सतत रिक्षा बदलत होता; अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी कसा लावला अपहरणकर्त्याचा शोध ?
| Updated on: Sep 26, 2023 | 3:30 PM
Share

नवी मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : शहरातील गुन्ह्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गुन्ह्याची अशीच एक खळबळजनक घटना नवी मुंबईमध्ये घडली. तेथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीचे अपहरण (kidnapping case) करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी कसून तपास करत अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यासाठी त्यांनी १५० हून अधिक सीसीटीव्हींचे फुटेजही (scanned CCTV Footage)  तपासले. अखेर आरोपीला दारवे गावातून अटक ताब्यात घेण्यात आले आणि त्या चिमुकल्या मुलीची सुखरूप पण सुटका करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणी थॉमस असे आरोपीचे नाव असून तो 74 वर्षांचा आहे. अपहृत मुलगी ही नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या झोपडपट्टीत राहते. दोन दिवसांपूर्वी ती तिच्या भावंडासोबत खेळत असताना, आरोपी थॉमसने तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवले आणि तिला घेऊन गेला. मुलगी बराच वेळ न सापडल्याने तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेतली.

सीनिअर इन्स्पेक्टर तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले व आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात झाली. आरोपीचा व लहान मुलीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी त्या भागातील जवळपास 150 सीसीटीव्हीच्या फुटेजचा तपास केला. मात्र पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी एकामागोमाग एक अशा रिक्षा बदलत होता.

अखेर त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी करावे गावात शनिवारी सापळा रचला. आरोपी थॉमस त्या जाळ्यात अलगद अडकला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. अपहरण करण्यात आलेल्या लहान मुलीची सुखरूपपणे सुटका करून पोलिसांनी तिला तिच्या पालकांकडे सोपवले.

मूल नसल्याने केले अपहरण

अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपी मणी थॉमसची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने अपहरणाचा गुन्हा कबूल केला. त्याच्या सांगण्यानुसार, त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. मात्र तिला मूल होऊ शकत नसल्याने त्याने या छोट्या मुलीचे अपहरण केले, अशी सबब त्याने सांगितली. मात्र ही गोष्ट कितपत खरी आहे याचा पोलिस अद्याप शोध घेऊन आरोपी हा मानवी तस्करीच्या गुन्ह्यात सहभागी आहे का, याचाही पोलिस कसून तपास करत आहेत.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर