जिवंत बाळाला गोणीत भरलं, कचऱ्यातं फेकलं आणि… मन हेलावून टाकणारी घटना

जिवंत बाळ कचऱ्यात सापडले.

जिवंत बाळाला गोणीत भरलं, कचऱ्यातं फेकलं आणि... मन हेलावून टाकणारी घटना
697574663
| Updated on: Oct 19, 2022 | 8:59 PM

वसई : पोटचं लेकरु म्हणजे आईच्या काळजाचा तुकडा. मात्र, एका निर्दयी महिलेने मातृत्वाला कलंक लावणारे कृत्य केले आहे. जिवंत बाळाला गोणीत भरुन कचऱ्यातं फेकलं आहे. नालासोपारा येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. हे बाळ सुखरुप आहे. नालासोपाऱ्यात ही मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. नालासोपारा पूर्व लक्ष्मी नगर परिसरात एक नवजात जिवंत बाळ कचऱ्यात सापडले आहे.

गोणीत भरून या बाळाला कचऱ्याच्या ढिगा-यात फेकून दिले. या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळून जाणाऱ्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला.
स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला आहे. स्थानिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

या प्रकरणी आचोळा पोलीस ठाण्यात भादवी कलम 317 प्रमाणे अज्ञात माते विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस याबाबत निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.