12 ऐवजी त्या गाडीत तब्बल 25 प्रवासी कोंबले…गाडी दरीत कोसळल्यावर काय घडलं ?

| Updated on: Nov 01, 2022 | 1:57 PM

पेठच्या पळशी आणि चिखली रस्त्यावरील घाटात हा अपघात झाला आहे. शेतमजुरांनी कोंबलेली क्रूझर गाडी ब्रेक फेल झाल्याने दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

12 ऐवजी त्या गाडीत तब्बल 25 प्रवासी कोंबले...गाडी दरीत कोसळल्यावर काय घडलं ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिकच्या ग्रामीण भागात अवैध वाहतुकीला कधी आळा बसणार ? हा प्रश्न वारंवार निर्माण होऊ लागला आहे. नुकताच नाशिकच्या पेठ रोडवरील चिखली येथील प्रवासू वाहतूक करणारी जीप दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. नाशिकपासून अवघ्या पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी भागात अवैध प्रवासी वाहतूक हा मोठा कळीचा मुद्दा आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. मात्र, याच भागात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर यावर कारवाईची मागणी होत असते. मात्र, अवैध प्रवासी वाहतूक ही डोळ्या देखत होत असतांना प्रशासन कारवाई का करीत नाही ? अशी चर्चा पेठरोडवरील अपघातानंतर होऊ लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात हा अपघात घडला आहे.

पेठच्या पळशी आणि चिखली रस्त्यावरील घाटात हा अपघात झाला आहे. शेतमजुरांनी कोंबलेली क्रूझर गाडी ब्रेक फेल झाल्याने दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

क्रूझर गाडी दरीत कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर त्यात धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 12 ऐवजी 24 प्रवासी कोंबलेल्या स्थितीत होते.

हे सुद्धा वाचा

या अपघातात दोन प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला असून इतर जखमी झालेल्या प्रवाशांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नाशिकच्या आदिवासी भागात अवैध प्रवासी वाहतूक नित्याचीच झाली असून विशेष म्हणजे ही वाहतूक करणारी वाहनं कालबाह्य झाली आहे.

मुदत संपलेली वाहनं घेऊन वाहतूक होत असतांना प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास येत नाही का ? की आर्थिकबाबींमुळे डोळेझाक केली जाते अशी चर्चा यानिमित्ताने उपस्थित होऊ लागली आहे.

या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीत गाडीमध्ये कोंबून प्रवाशांना बसवलं जातं, गाडीच्या बोनेट आणि टपावर देखील प्रवासी बसलेले असतात.

त्यामुळे आता या अपघातानंतर तरी प्रशासन दखल घेऊन कारवाई करणार का ? की नेहमीप्रमाणे डोळेझाक करत प्रवाशांच्या जीवाशी खेळणार याकडे पाहणं महत्वाचे आहे.