AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅमसंगचा दमदार बॅटरी पॉवर असलेला नवीन स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फिचर्स काय?

सॅमसंग कंपनीने त्यांचा नवीन 5G स्मार्टफोन भारतातील ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये मीडियाटेक प्रोसेसर आणि दमदार बॅटरी आहे. तर या फोनमध्ये कोणते फीचर्स आहेत आणि त्याची किंमत किती असेल याबद्दल जाणून घेऊयात.

सॅमसंगचा दमदार बॅटरी पॉवर असलेला नवीन स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फिचर्स काय?
Samsung Galaxy A07 5G
| Edited By: | Updated on: Feb 07, 2026 | 4:14 PM
Share

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच सॅमसंग कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A07 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. तर हा हँडसेट दोन रॅम स्टोरेज आणि तीन वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये भारतीय बाजारातपेठेत सादर केलेला आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये एक पॉवरफूल बॅटरी, एक मीडियाटेक प्रोसेसर आणि एक ड्युअल रियर कॅमेरा सेटअप समाविष्ट आहे. अशातच हा हँडसेट तुम्हाला कोणत्या किमतीत खरेदी करता येईल आणि त्याची प्रमुख फिचर्स काय आहेत? चला जाणून घेऊयात.

Samsung Galaxy A07 5G स्मार्टफोनची भारतात किंमत

या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 15 हजार 999 रूपये आहे, ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. तसेच 6 जीबी/128 जीबी स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 17 हजार 999 रूपये आहे. सुरुवातीच्या ऑफरचा भाग म्हणून तुम्हाला एसबीआय, एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक कार्डवर 1 हजार रूपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देखील उपलब्ध होणार आहे.

Samsung Galaxy A07 5G स्मार्टफोन या फोनशी करणार स्पर्धा

सॅमसंगच्या या नवीन हँडसेटच्या या किंमतीच्या रेंजमध्ये, हा सॅमसंग ब्रँड फोन Nothing Phone 2 Pro, realme P4x 5G, MOTOROLA G96 5G आणि POCO M8 सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.

Samsung Galaxy A07 5G स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन: या ड्युअल-सिम फोनमध्ये 6.7-इंचाचा एचडी प्लस (720×1,600पिक्सेल) आयपीएस एलसीडी स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ पर्यंत आहे आणि 800 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे.

चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 ऑक्टा कोर चिपसेट आहे.

कॅमेरा सेटअप: ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनमध्ये 50 -मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 1080p/30fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.3, USB Type-C पोर्ट, GPS, GLONASS आणि QZSS सपोर्ट आहे. सुरक्षिततेसाठी या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आलेला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार