AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 वर्षांमध्ये ‘या’ दिग्दर्शकाने दिला नाही एकही सुपरहिट, तरीही जिंकले 4 नॅशनल अवॉर्ड

बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्दर्शक आहेत ज्यांचे आतापर्यंत एकही चित्रपट हिट ठरला नाही. ज्यांनी 24 वर्षांमध्ये दिला नाही एकही सुपरहिट. तरीही जिंकले 4 नॅशनल अवॉर्ड. 11 चित्रपटांपैकी 4 निघाले प्रचंड महाफ्लॉप.

24 वर्षांमध्ये 'या' दिग्दर्शकाने दिला नाही एकही सुपरहिट, तरीही जिंकले 4 नॅशनल अवॉर्ड
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 07, 2026 | 4:14 PM
Share

Vishal Bhardwaj : कथा, व्यक्तिरेखा आणि संगीत हीच विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटांची खरी ताकद मानली जाते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून समाज, मानवी नातेसंबंध वेगळ्या शैलीत मांडण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवाहातील सिनेमांपेक्षा वेगळा विचार, गंभीर विषय आणि आशयपूर्ण मांडणी हीच त्यांच्या चित्रपटाची ओळख ठरली आहे. त्यांच्या चित्रपटांचे संगीतही नेहमीच वेगळे आणि कथेशी एकरूप असते. अनेक कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीतील लक्षात राहणाऱ्या भूमिका विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटांतून मिळाल्या आहेत.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मकडी’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी ‘मकबूल’, ‘ओमकारा’, ‘कमीने’, ‘इश्किया’, ‘7 खून माफ’, ‘एक थी डायन’, ‘हैदर’, ‘तलवार’, ‘रंगून’ आणि ‘पटाका’ यांसारखे अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले. या चित्रपटांपैकी बहुतांश चित्रपटांचे संगीत स्वतः विशाल भारद्वाज यांनीच संगीतबद्ध केले असून, कथा आणि संगीत यांचा अद्वितीय संगम त्यांच्या चित्रपटातून दिसून येतो.

विशाल भारद्वाज यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत नसले तरी त्यांच्या चित्रपटांतील व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. 2006 मध्ये आलेल्या ‘ओमकारा’मधील लंगडा त्यागी हे पात्र आजही एक क्लासिक व्हिलन म्हणून ओळखले जाते. तर ‘हैदर’ या चित्रपटातून काश्मीरमधील वास्तव परिस्थिती निर्भीडपणे मांडण्यात आली. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पटाका’मध्ये दोन बहिणींमधील नात्यातील कटुता अतिशय साध्या आणि प्रभावी पद्धतीने दाखवण्यात आली. त्यांच्या चित्रपटांमधील कथा प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवते, हीच त्यांची सर्वात मोठी यशस्वी बाजू मानली जाते.

11 चित्रपटांपैकी 4 महाडिझास्टर

31 वर्षांच्या कारकिर्दीत विशाल भारद्वाज यांनी एकूण 11 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. यापैकी 4 चित्रपट बॉक्स ऑफिसवर महाडिझास्टर ठरले. फ्लॉप आणि सरासरी यश मिळालेल्या चित्रपटांनंतरही त्यांच्या कामाची दखल सरकारने घेतली असून त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या चार चित्रपटांना नॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत.

त्यांचा पहिलाच चित्रपट ‘मकडी’ मधील बालकलाकार श्वेता बासु प्रसाद हिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द ब्लू अंब्रेला’ या चित्रपटालाही नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला तरी. 2006 मधील ‘ओमकारा’ला स्पेशल ज्यूरी अवॉर्ड मिळाला. तर 2014 मधील ‘हैदर’ या चित्रपटासाठी विशाल भारद्वाज यांना सर्वोत्तम पटकथा आणि संवाद लेखनासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला. याशिवाय 2015 मधील ‘तलवार’ या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेल्या पटकथेलाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.