AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Accident : रात्रीचे 10 वाजून 19 मिनिटे… अख्खी कार थेट विहिरीत… 5 मिनिटानंतर दिसेनाशी, 3 तास रेस्क्यू ऑपरेशन; रस्त्याच्या मधोमधच…

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावात शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणारी कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बंद काचांमुळे गाडीतील लोक बाहेर पडू शकले नाहीत. या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून, प्रशासनाने चौकशीचे आदेश देत मृतांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Nashik Accident : रात्रीचे 10 वाजून 19 मिनिटे... अख्खी कार थेट विहिरीत... 5 मिनिटानंतर दिसेनाशी, 3 तास रेस्क्यू ऑपरेशन; रस्त्याच्या मधोमधच...
अख्खी कार विहीरत बुडालीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 11:47 AM
Share

शुक्रवारची रात्र ही नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावासाठी काळरात्र ठरली. दरगोडे कुटुंबीय एका खाजगी कार्यक्रमासाठी संध्याकाळी घराबाहेर पडले, पण ते परत आलेच नाही, गावात आली ती 9 जणांच्या अपघाती मृत्यूची बातमी. काल रात्री 10-15 च्या सुमारास दिंडोरी गावात भरधवा वेगाने येणारी कार, रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहीरीत कोसळली आणि एकच कल्लोळ उडला. सुनील दत्तू दरगोडे यांच्यासह एकूण 9 जण त्यागाडीत होते, पण पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहीरीत ती कार थेट खाली कोसळली आणि उरला तो फक्त आक्रोश आणि किंकाळ्या.

भयाण अंधारात ही कार विहीरत पडली आणि 9 जणांना त्या विहीरीने अक्षरश:गिळलं. मोठ्ठा आवाजा आला, तो ऐकताच गावात राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांनी पटापट तिथे धाव घेतली. समोरचं दृश्य पाहून ते थिजलेच. विहीरत पडलेली कार वर 5 मिनिटं दिसंत होती. पण अवघ्या काही क्षणात ती पाण्यात दिसेनाशी झाली. ते पाहून सर्वांच्याच तोंडचं पाणी पळाल. त्यातच गाडीच्या काचा बंद असल्याने आतमध्ये बसलेले लोक कारमध्येच अडकून पडले होते, त्यांचा बाहेर पडण्याचा मार्गही दुरापास्त झाला.

काच लावल्याने आत अडकले लोकं, आक्रोश आणि टाहो…

आतमध्यल्या लोकांनी काचा फोडण्याचा प्रयत्न केला, पण त्य़ांना यश मिळालं नाही. पाहता पहात विहीरतल्या पाणीरुपी काळाने त्यांना जिवत गिळलं आणि थोड्याच वेळात सगळं शातं झालं. उपस्थित स्थानिकांनी दुर्घटनेची बातमी दिल्यावर प्रशासन धडाधड कामाला लागलं , साधारण 20 मिनिटानंतर अग्निशमन दल आणि प्रशासनाचे लोक आले. विहीरीत मोठे दोरखंड लावून बचावकार्य सुरू करण्यात आलं. स्थानिकांनीही गाजीतल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली. एकीकडे अग्निशमन दलाचे लोक कार्यरत असतानाच स्थानिकांनी टार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला. तब्बल 3 तासांनी ही कार बाहेर काढण्यात आली. त्यावेळी कारमध्ये 8 जण होते, तर एक लहान मुलगी बाहेर विहीरीत होती. अथक प्रयत्नांनी सर्वांना बाहेर काढल, मात्र 9 ही लोकांचा मृत्यू झाला होता. यामुळे संपूर्ण गाव हादरलं असून इंदोरे गावार तर शोककळा पसरली आहे.

दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून विहीर मालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक दुर्घटनेची टाईमलाईन

* रात्री 10.19 मिनिटांनी झाला अपघात

* विहिरीचा कठडा तोडून कार थेट विहिरीत़

* मोठा आवाज झाला

* आजू बाजूचे लोकं धावत आले

* विहिरीत गाडी 5 मिनिट दिसत होती

* गाडीचे टेल लॅम्प दिसत होते

* मात्र 5 मिनिटानंतर गाडी दिसेनाशी झाली

* गाडीच्या काचा बंद असल्याने सगळे लोक गाडीतच अडकून पडले

* गाडीतील लोक काचा फोडण्याचा पर्यंत करत होते

* मात्र काही मिनिटातच संपूर्ण गाडी बुडाली

* साधारण 20 मिनिटानंतर अग्निशमन दल आणि प्रशासनाचे लोक आले

* विहिरीत मोठा दोरखंड टाकण्यात आले

* मोटार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला

* मात्र तब्बल 3 तासानंतर गाडी बाहेर काढण्यात आली

* 8 जण गाडीत होते

* तर एक लहान मुलगी बाहेर विहिरीत पडलेली होती

* गाडीसह सगळ्यांना बाहेर काढले

* मात्र सगळे 9 जण मृत्युमुखी पडले

* सगळ्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले

* सकाळी 9.30 वाजता नरहरी झिरवाळ घटनास्थळी आले

* त्यानंतर 10.15 वाजता गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले

* गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांमध्ये 5 मिनिट चर्चा

* घटनेच्या चौकशीचे आदेश

* विहीर मालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

* मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल