AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझे केस : मीना जॉर्जच्या नावे मीरा रोडमध्ये फ्लॅट भाड्याने, 13 तासांच्या तपासानंतर NIA महिलेसह मुंबईला रवाना

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर 401 मध्ये रात्रभर तपास करत होती. ( NIA detained woman from Mira Road)

सचिन वाझे केस : मीना जॉर्जच्या नावे मीरा रोडमध्ये फ्लॅट भाड्याने, 13 तासांच्या तपासानंतर NIA महिलेसह मुंबईला रवाना
मीरा रोडमध्ये एनआयएच्या कारवाईत महिला ताब्यात
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 02, 2021 | 7:46 AM
Share

मीरा रोड : अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्यासोबत दिसलेल्या ‘मिस्ट्री वूमन’चं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएचे (NIA) पथक गुरुवारी रात्रीपासून जवळपास 13 तास तपास करत होते. त्यानंतर एका बुरखाधारी महिलेसह एनआयएची टीम मुंबईला रवाना झाली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी काही धागेदोरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (NIA detained woman from Mira Road reportedly seen with Sachin Vaze in Mukesh Ambani Antilia Bomb Scare)

मीरा रोडच्या रुममध्ये 13 तास तपास

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर 401 मध्ये रात्रभर तपास करत होती. एनआयएचे पथक एक एप्रिलला (गुरुवारी) संध्याकाळी सहा वाजता दाखल झाली होती. बारा तासांहून अधिक काळ तपास सुरु असल्याने एनआयए पथकाला काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मीना जॉर्ज नावाने रुम भाड्यावर

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सचिन वाझे प्रकरणाचा तपास सुरु आहे. सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर 401 मीना जॉर्ज या महिलेच्या नावाने भाड्यावर घेतली आहे. ही खोली गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे.

एनआयएने ताब्यात घेतलेली महिला 16 फेब्रुवारीला सचिन वाझेंसोबत दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसलेली महिला असल्याचा संशय आहे. संबंधित महिला वाझेंची निकटवर्तीय असल्याचं बोललं जातं.

मिठी नदीतून डीव्हीआर आणि कॉम्प्युटर जप्त

काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे यांनी आपण सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर आणि कॉम्प्युटर मिठी नदीत टाकल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांना सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन या सर्व गोष्टी मिठी नदीतून मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने शोधून काढल्या होत्या. आता या सर्व गोष्टींची तपासणी सुरु आहे. ( NIA detained woman from Mira Road)

मुकेश अंबानींच्या घराजवळ मिळालेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी NIA च्या हाती बुधवारी आणखी एक आलिशान गाडी लागली. सचिन वाझे वापरत असलेल्या ऑडी कारचा तपास NIA कडून गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. NIA ने  वसई परिसरातून MH 04 FZ 6561 नंबरची ऑडी ताब्यात घेतली.

संबंधित बातम्या :

Sachin Vaze : सचिन वाझेच्या वापरातील अजून एक अलिशान ‘आऊटलँडर’ गाडी ताब्यात

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखायला लागल्याने रुग्णालयात नेण्याची वेळ

(NIA detained woman from Mira Road reportedly seen with Sachin Vaze Mukesh Ambani Antilia Bomb Scare)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...