सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखायला लागल्याने रुग्णालयात नेण्याची वेळ

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखायला लागल्याने रुग्णालयात नेण्याची वेळ
सचिन वाझेच्या वापरातील आऊटलँडर गाडी एनआयएकडून जप्त

याठिकाणी त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. तेव्हा सचिन वाझे यांना मधुमेहाचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले होते. | Sachin Vaze NIA

Rohit Dhamnaskar

|

Mar 30, 2021 | 10:24 AM

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात असलेल्या सचिन वाझे (Sachin Vaze) यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सचिन वाझे यांच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यामुळे रात्री साडेदहाच्या सुमारास NIAच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री 1.30च्या सुमारास सचिन वाझे यांना परत आणण्यात आले. (Sachin Vaze health deteriorates in NIA custody)

यापूर्वीही चौकशीदरम्यान दोन-तीन वेळा सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हादेखील एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले होते. याठिकाणी त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. तेव्हा सचिन वाझे यांना मधुमेहाचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले होते.

‘एनआयए’कडून सध्या सचिन वाझे यांची कसून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे यांनी आपण सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर आणि कॉम्प्युटर मिठी नदीत टाकल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांना सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन या सर्व गोष्टी मिठी नदीतून मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने शोधून काढल्या होत्या. आता या सर्व गोष्टींची तपासणी सुरु आहे.

विनायक शिंदे आणि नरेश गौरवरही UAPA कायद्यानुसार कारवाई होणार

अंबानी स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गौर यांच्यावरही UAPA अर्थात Unlawful Activities Prevention Act नुसार कारवाई होणार आहे. हे दोन्ही आरोपी मनसुख हिरेन प्रकरणात सध्या NIAच्या अटकेत आहेत.

सचिन वाझेविरोधात UAPA अंतर्गत गुन्हा

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांच्या विरोधातही NIAने UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाझे यांना ताब्यात घेतल्यानंतर NIA ने मोठी कारवाई केली होती.

लोकसभेत जुलै 2019 मध्ये या कायद्यातील तरतुदींना मंजुरी मिळाली. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला तपासाच्या आधारावर दहशतवादी जाहीर करण्याचा अधिकार सरकारला आहे. यापूर्वी फक्त संघटनेला दहशतवादी जाहीर करण्याची तरतूद या कायद्यात होती.

संबंधित बातम्या:

‘वाझे साहेबच मेन आहेत, काही होणार नाही’; मनसुख हिरेनचे भावासोबतचे फोनवरील संभाषण उघड

Sachin Waze: सहकारी वाझेंना म्हणायचे ‘टेक कॉप’; तयार केलं होतं स्वत:चं सर्च इंजिन आणि मोबाईल मेसेजिंग अ‍ॅप

Sachin Waze: मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ अधिकाऱ्याकडे केस गेली अन् घाबरलेल्या सचिन वाझेंनी मनसुखला संपवले

(Sachin Vaze health deteriorates in NIA custody)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें