Medical student missing : आता या मेडीकल कॉलेजची स्टुडंड बेपत्ता झाल्याने खळबळ, जे.जे.नंतर आता या कॉलेजची विद्यार्थीनी घरी न परतल्याने चिंता

मुंबईच्या जे.जे. मेडीकल कॉलेजची विद्यार्थीनी सदिच्छा साने बेपत्ता झाल्याचे प्रकरण चर्चेत आहे. आणखी एका मान्यताप्राप्त मेडीकल कॉलेजची विद्यार्थीनी एकॅडमिक इयरच्या पहील्याच दिवशी कॉलेजला गेली ते घरीच आली नाही...

Medical student missing  : आता या मेडीकल कॉलेजची स्टुडंड बेपत्ता झाल्याने खळबळ, जे.जे.नंतर आता या कॉलेजची विद्यार्थीनी घरी न परतल्याने चिंता
आयआयटी मुंबईत विद्यार्थ्याने जीवन संपवलेImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 8:01 AM

मुंबई : एकीकडे जे.जे. ग्रँट मेडीकल (  GRANTMEDICAL ) कॉलेजची तिसऱ्या वर्षांची विद्यार्थीनी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा तपासाचा गुंता वाढतच असताना मुंबईच्या आणखी एका मेडीकल कॉलेजची विद्यार्थीनी ( Medical student ) नाहीसी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थीनी कॉलेजला गेली होती. त्यानंतर तिने आपल्या आईला लोकलमध्ये (  LOCAL ) बसताना मी घरी येत आहे असा आपल्या मोबाईलवरून कॉलही केला होता.  त्यानंतरही ती घरी न परतल्याने तिचे पालक काळजीत पडले आहेत. भोईवाडा पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मुंबईच्या जे.जे. मेडीकल कॉलेजची विद्यार्थीनी सदिच्छा साने बेपत्ता झाल्याचे प्रकरण चर्चेत आहे, त्या प्रकरणाचा तपास करताना मुंबईच्या नावाजलेल्या क्राईम ब्रॅंचला नाकीनऊ आले आहे. त्यातच आता मुंबईच्या केईएम मेडीकल कॉलेजला शिकत असलेली एक विद्यार्थीनी मंगळवारपासूनच बेपत्ता झाली आहे.

केईएम जीएस मेडीकल कॉलेजची विद्यार्थीनी तिच्या एकॅडमिक इयरच्या पहील्याच दिवशी कॉलेजला गेली ते घरीच आली नाही. एक्युपेशनल थेरेपीची ही विद्यार्थीनीने मंगळवारी तिचा अभ्यासक्रमाचा पहील्याच दिवसाचे लेक्चर देखील अटेन्ड केल्याचे तिच्या महाविद्यालयातील सहकाऱ्याकडून पालकाना समजले आहे. तिच्या पालकांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार देखील दाखल केली आहे. त्यानंतर पोलीसांनी कॉलेजात चौकशी देखील केली आहे. त्याचवेळी त्यांना ती कॉलेजात लेक्चरला उपस्थित होती हे पोलीसांना कळले.

भोईवाडा पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही विद्यार्थीनी एक्युपेशनल थेरेपीचे दुसऱ्या वर्गाचे शिक्षण घेत असून तिने कॉलेजमधून निघताना आपल्या आईला कॉल देखील केला होता. लोकल पकडल्याचे तिने आईला कळविले होते. परंतू ती त्यानंतर घरी परतली नसल्याचे भोईवाडा पोलीसांनी सांगितल्याचे टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे. एकीकडे जे.जे. मेडीकल स्टुडंट बेपत्ता झाल्यानंतर तिची लाईफगार्डने हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अशा प्रकारे आपली मुलगी मंगळवारपासून घरीच न परतल्याने या मुलीच्या पालकांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.