सकाळी जिने बांधली राखी, भावाने त्याच बहिणीवर केला बलात्कार… कुठे घडला संतापनक प्रकार ?

मृतक ही त्याच्या काकाची मुलगी, त्याची चुलतबहीण होती. रक्षाबंधनाच्या दिवशी तो सकाळी तिच्या घरी आला आणि तिने त्याला राखी बांधली. आरोपीला दारू प्यायचे व्यसन आहे. त्या दिवशीही त्याने रात्री खूप दारू प्यायली आणि...

सकाळी जिने बांधली राखी, भावाने त्याच बहिणीवर केला बलात्कार... कुठे घडला संतापनक प्रकार ?
क्राईम न्यूज
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Aug 13, 2025 | 10:23 AM

देशभरात रक्षाबंधनाचा सण नुकताच उत्साहाने पार पडला. मात्र त्याच दिवशी एका भावाने, भाऊ-बहिणीच्या प्रेमळ, पवित्र नात्यालाचं कलंकित केलं. उत्तर प्रदेशच्या औरेयामध्ये एका भावाने त्याच्या चुलत बहिणीकडून राखी बांधून घेतली. मात्र त्याच राखीच्या सणाच्या रात्री त्याने बहिणीला त्याच्या वासनेची शिकार बनवलं. मात्र आपलं बिंग फुटेल, दुष्कृत्य समोर येईल या भीतीने त्याने त्याच्या अल्पवयीन चुलत बहिणीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केली. एवढंच नव्हे तर त्या मृत्यूला आत्महत्येचं रूप देण्याचाही त्याने प्रयत्न केला. पण अखेर त्याचं बिंग फुटलंच आणि पोलिसांनी हाँ गुन्हा उघडकीस आणत बलात्कारी आणि मारेकरी भावाला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण औरैयाच्या बिधुना पोलीस स्टेशन परिसरातील आहे. 10 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात 14 वर्षांच्या मुलीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. तिचा मृतदेह सापडल्यानंतर मृत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीवर बलात्कार आणि हत्येची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

पोलिसांनी काय सांगितलं ?

यानंतर पोलिसांनी पुढील तपास करून कारवाई सुरू केली. पोलीस अधीक्षक अभिजीत आर शंकर यांनी माहिती दिली की, परिसरातील एका गावातील एका घरात 14 वर्षांच्या मुलीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला आहे अशी माहिती 10 ऑगस्ट रोजी बिधुना कोतवाली पोलिसांना मिळाली. या घटनेची सूचना मिळाल्यानंतर बिधुना कोतवाली पोलिसांनी मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

आरोपीने कबूल केला गुन्हा

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की बलात्कारानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. यानंतर, बिधुना कोतवाली पोलिस आणि घटनेच्या तपासात गुंतलेल्या स्वाट टीमने अनेक संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्या मुलीच्या काकांचा मुलगा, तिच्या चुलतभावाने गुन्हा कबूल केला आणि आपणच बहिणीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितलं.

रात्री दारूच्या नशेत घरी आला आणि..

आरोपी सुरजीतने सांगितले की, मृतक ही त्याच्या काकाची मुलगी, त्याची चुलतबहीण होती. रक्षाबंधनाच्या दिवशी तो सकाळी तिच्या घरी आला आणि तिने त्याला राखी बांधली. आरोपीला दारू प्यायचे व्यसन आहे. त्या दिवशीही त्याने रात्री खूप दारू प्यायली. त्यानंतर रात्री पोट बिघडल्यामुळे तो घरासमोरील शेतात टॉयलेटला  गेला. त्यानंतर, तो मृत बहिणीतच्या जवळ गेला, जी त्यावेळी खाटेवर झोपली होती.

सुरजीतने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने त्याच्या बहिणीला स्पर्श करताच ती जागी झाली. त्यानंतर त्याने त्याच्या चुलत बहिणीचे तोंड दाबले आणि त्याची वासना शांत करत तिच्यावर अतयाचार केला. मात्र आपला हा गुन्हा उघडकीस येईल या भीतीने त्याने तिचा गळा दाबून खून केला. मात्र अखेर त्याचे बिंग फुटलेच, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले.