Palghar: प्रेयसी ‘गंडवत’ असल्यामुळे लहान मुलाचे अपहरण, कुटुंबियांना फुटला घाम, पण…

लग्नास चालढकल करणाऱ्या प्रेयसीच्या मोठ्या बहिणीच्या मुलाचे अपहरण, प्रकरण उजेडात येताचं पोलिस सुध्दा...

Palghar: प्रेयसी गंडवत असल्यामुळे लहान मुलाचे अपहरण, कुटुंबियांना फुटला घाम, पण...
शाळा भरण्यापूर्वी अपहरण
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 10, 2023 | 8:08 AM

पालघर : प्रेयसी वारंवार गंडवत असल्यामुळे संपालेल्या प्रियकराने (boyfriend) प्रेयसीच्या लहान मुलाचे अपहरण केले. त्यानंतर रोक रक्कम आणि प्रेयसीच्या बहिणीला प्रेयसीला घरी पाठवण्याची मागणी केली. संबंधित कुटुंबाने पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी (POLICE) अवघ्या तासाभरात मुलाची सुटका केली आणि आरोपीला ताब्यात घेतले असल्याची घटना पालघरमध्ये (PALGHAR) घडली. कालपासून पालघरमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.

4 वर्षांपासून त्याचे प्रेम संबंध

विशेष म्हणजे अपहरणकर्ता हा आरोपी युट्युबर आणि आदिवासी सिंगर असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
राजेश धोदडे असे आरोपीचे नाव असून फिर्यादी महिलेच्या बहिणी सोबत गेल्या 4 वर्षांपासून त्याचे प्रेम संबंध होते. परंतु चार वर्षापासून संबंध असून ही लग्नास चालढकल करत असल्याने प्रेयसीला प्रियकराशी संबंध न ठेवण्यास प्रेयसीची बहीण कारणीभूत ठरत असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना सांगितली आहे.

शाळा भरण्यापूर्वी अपहरण

संतापलेल्या प्रियकराने राग मनात धरत प्रेयसीच्या मोठ्या बहिणीच्या 8 वर्षीय मुलांचेच सोमवारी शाळा भरण्यापूर्वी अपहरण केल्याचा प्रकार उजेडात आले. तलासरी पोलीसांनी सदर घटनेची माहिती मिळताच तातडीने दोन टीम तयार करत संशयित आरोपीचे फोन लोकेशन्स व संबंधित माहितीच्या आधारे तपास करत आरोपीस चारोटी येथून अटक केली.

आरोपीच्या माहितीवरून अपहरण झालेल्या मुलाला केंद्र शासित प्रदेश सेलवास खानवेल येथून यशस्वीरित्या ताब्यात घेत सुटका करून आईच्या स्वाधीन केले. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.