AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपुरात चोरीला गेलेले मोबाईल कर्नाटकात ट्रेस, अल्पवयीन चोरट्याकडे घबाड सापडलं

पंढरपूर : पंढरपुरात चोरलेले मोबाईल चक्क कर्नाटकात सापडले. याप्रकरणी कर्नाटकातील शिगोमा (Pandharpur Mobile Thief Arrested From Karnataka) येथील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहेत. त्याच्याकडून तब्बल 2 लाख 17 हजार रुपयांचे 21 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत (Pandharpur Mobile Thief Arrested From Karnataka). पंढरपूरच्या बाजारपेठेतून नागरिकांचे मोबाईल चोरल्या प्रकरणी कर्नाटकातील शिमोगा येथील बालकाला पंढरपूर पोलिसांनी ताब्यात […]

पंढरपुरात चोरीला गेलेले मोबाईल कर्नाटकात ट्रेस, अल्पवयीन चोरट्याकडे घबाड सापडलं
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Feb 04, 2021 | 3:21 PM
Share

पंढरपूर : पंढरपुरात चोरलेले मोबाईल चक्क कर्नाटकात सापडले. याप्रकरणी कर्नाटकातील शिगोमा (Pandharpur Mobile Thief Arrested From Karnataka) येथील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहेत. त्याच्याकडून तब्बल 2 लाख 17 हजार रुपयांचे 21 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत (Pandharpur Mobile Thief Arrested From Karnataka).

पंढरपूरच्या बाजारपेठेतून नागरिकांचे मोबाईल चोरल्या प्रकरणी कर्नाटकातील शिमोगा येथील बालकाला पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे 2 लाख 17 हजार रुपयांच्या किमतीचे 21 मोबाईल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.

सतीश कळसकर हे दसऱ्यानिमित्त फुल खरेदी करण्यासाठी 8 ऑक्टोबर 2019 ला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गेले होते. त्यावेळी त्यांचा मोबाईल कोणीतरी चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या सूचनेनुसार प्रकटीकरण शाखेतील अधिकारी राजेंद्र गाडेकर यांचे पथक काम करत होते. गुन्ह्यात गेलेला मोबाईल हा कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात ट्रेस झाला (Pandharpur Mobile Thief Arrested From Karnataka).

हा मोबाईल अल्पवयीन बालकाकडे सापडला. त्या बालकाची अधिक चौकशी करुन त्याच्याकडून आणखी 20 मोबाईल ताब्यात घेण्यात आले. या 21 मोबाईलची एकूण किंमत दोन लाख 17 हजार रुपये एवढी आहे. ही कारवाई फौजदार राजेंद्र गाडेकर, हवालदार शरद कदम यांनी केली आहे.

Pandharpur Mobile Thief Arrested From Karnataka

संबंधित बातम्या :

Video | कल्याणमध्ये फिल्मी थरार, पोलीस व्हॅनवर हल्ला करुन आरोपीला पळवलं

मॉर्निंग वॉकला गेल्या अन् परतल्याच नाहीत, जालनामधून सावध करणारी बातमी!

VIDEO | धपाक धपाक धूम, विरार भाजी मार्केटजवळ फ्री स्टाईल हाणामारी

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ