मॉर्निंग वॉकला गेल्या अन् परतल्याच नाहीत, जालनामधून सावध करणारी बातमी!

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांचा अपघाती मृत्यू झाला. मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मॉर्निंग वॉकला गेल्या अन् परतल्याच नाहीत, जालनामधून सावध करणारी बातमी!

जालना : जालनामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांचा (Jalna Two Woman Died In Accident) अपघाती मृत्यू झाला. मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे (Jalna Two Woman Died In Accident).

पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे आज सकाळी 5 ते साडे पाच वाजेच्या दरम्यान महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये मनिषा साहेबराव पाटील (वय 50) आणि अनिता शहादु पाटील (वय 48) या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

सामनेर तालुक्यातील पाचोरा येथील महिला मनिषा साहेबराव पाटील (वय 50) आणि अनिता शहादु पाटील (वय 48) नेहमीप्रमाणे सकाळी पाच ते साडे पाच वाजेच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. या दोन्ही महिला मॉर्निंग वॉक करुन घरी परतत असताना अज्ञात इनोव्हा कारने त्यांना जोरदार धडक दिली. कारने धडक दिल्याने दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला (Jalna Two Woman Died In Accident).

हा अपघात एवढा जोरदार होता की, एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली, तर दुसऱ्या महिलेला या कारने 50 मीटरपर्यंत फरफटत नेले. या दोन्ही महिलांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. घटनास्थळी पाचोरा पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Jalna Two Woman Died In Accident

संबंधित बातम्या :

Video | उत्तम गालवा कंपनीतील अपघातात 38 मजूर भाजले, 10 गंभीर जखमी

अपघातवार | कराड, माळशेज घाट, पाटणमध्ये अपघात, चौघांचा मृत्यू

अपघातानंतर बाईक पेटली, एक जागीच जळून खाक, दुसऱ्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI