AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या पुत्रासमान…; पीएच्या लग्नावेळी पंकजा मुंडेंनी केलेली खास पोस्ट पुन्हा होतेय व्हायरल

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. लग्नानंतर अवघ्या 10 महिन्यांत घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबाने अनंत गर्जे आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. अनंताचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा संशय गौरीने व्यक्त केला होता. या प्रकरणी पंकजा मुंडेंची अनंतच्या लग्नाबद्दल केलेली एक जुनी पोस्ट पुन्हा व्हायरल होत आहे.

'माझ्या पुत्रासमान...; पीएच्या लग्नावेळी पंकजा मुंडेंनी केलेली खास पोस्ट पुन्हा होतेय व्हायरल
Pankaja Munde PA wife commits suicideImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 23, 2025 | 12:44 PM
Share

मुंबईच्या वरळी भागात घडलेल्या एका घटनेने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला अवघे काही महिनेच झाले असतानाच हा प्रकार घडल्याने अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. गौरी गर्ज असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिच्या कुटुंबाने अनंतवर गंभीर आरोपही केले आहेत.

अनंत हा बऱ्याच वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करत आहे

या घटनेबद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. भाजप नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत हा बऱ्याच वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करत आहे. या घटनेने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

पंकजा यांनी अनंत आणि गौरीच्या लग्नासाठी एक खास पोस्टही शेअर केली होती

आत्महत्या केलेली गौरी गर्जे ही डॉक्टर असून त्यांच्या लग्नाला अवघे दहाच महिने झाले होते. अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांचा विवाह देखील मोठ्या ताथामाटात झाला होता. त्यांच्या लग्नात पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. त्यांनी लग्नात या दोघांना एक छान गिफ्ट देखील दिलं होतं. तसेच त्यांच्या लग्नासाठी एक खास पोस्टही शेअर केली होती. त्यांची ही पोस्ट आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

“माझ्या पुत्रासमान, माझा स्वीय सहाय्यक…”

पंकजा मुंडेंनी पोस्टमध्ये म्हटले होते की, “माझ्या पुत्रासमान, माझा स्वीय सहाय्यक चि. अनंत गर्जे याचा आज शुभ विवाह पार पडला. चि. सौ.कां. डाॅ.गौरी सारखी सुंदर आणि सुशील सहचारिणी त्याला मिळाली. आज बीड येथे या दोघांच्या शुभ विवाह सोहळ्यात माझी आई, डॉ.प्रितमताई यांचेसह उपस्थित राहून नव वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. समवेत आ.नमिता मुंदडा उपस्थित होत्या.” अशी पोस्ट त्यांन केली होती तसेच त्यांनी लग्नाचे काही फोटोही शेअर केले होते. पण आता 10 महिन्यातच गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याचा आरोप 

दरम्यान अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याने गौरी गर्जे अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गौरी गर्जे यांचा सासरच्या मंडळींकडून छळ होत होता, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. ही आत्महत्या नसून हत्या आहे असा थेट आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी केला असून याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कुटुंबीय दाखल झाले आहेत. जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिकाही कुटुंबियांनी घेतली होती.

मुलीच्या मृत्यूसंदर्भात कुटुंबीयांचा आरोप

मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूसंदर्भात गंभीर संशय व्यक्त केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, अनंत हा एका नामांकित राजकीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात पीए म्हणून कार्यरत आहे. पतीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा संशय गौरीने वारंवार कुटुंबीयांना व्यक्त केला होता. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, तरुणीने पतीच्या कथित संबंधांचे काही पुरावे स्वतःच्या वडिलांना देखील पाठवले होते. या डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?