डॉक्टर गाैरी पालवेच्या आत्महत्येनंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया, पंकजा मुंडेंचा पीए अडचणीत, थेट म्हणाले, माझी लेक…
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने लग्नाच्या अवघ्या काही महिन्यानंतर आत्महत्या केली. आता या आत्महत्येनंतर गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर नातेवाईकांनी स्पष्टपणे म्हटले की, ही आत्महत्या नाही तर हत्या आहे.

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. अनंत गर्जेची पत्नी गाैरी पेशाने डॉक्टर होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये टोकाचा वाद सुरू होता. हेच नाही तर पत्नीला त्याने धमकीही दिली होती. अनंत गर्जेचे काही मुलींसोबत संबंध होते, याची माहिती गाैरीला कळाली आणि तिने अनंतला जाब विचारला. त्यानंतर तिने अनंतला माफ देखील केले. मात्र, त्यानंतर तो मुलींसोबत संपर्कात असल्याचे गाैरीच्या लक्षात आले. दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. अनंत आणि गाैरीचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. पंकजा मुंडे अनंत गर्जेला आपल्या मुलासारखे मानत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडेचा पीए म्हणून अनंत गर्जे काम करत. गाैरीच्या आत्महत्येबद्दल माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी त्यांचे नियोजित दाैरे रद्द केली.
गाैरी पालवे गर्जे यांच्या कुटुंबियांकडून अनंत गर्जे याच्यावर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर अनंत गर्जे करत असलेली दावे खोटे असल्याचे गाैरीच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. अनंत गर्जे फरार असल्याचा दावा, गाैरीच्या कुटुंबियांकडून केला जात असतानाच आता गाैरी पालवे हिचे वडील अशोक पालवे यांनी लेकीच्या आत्महत्येनंतर मोठे विधान केले. मुलीच्या आत्महत्येबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आता मी काय बोलू माझी लेक गेली…
सध्या गाैरी पालवे गर्जे हिचे संपूर्ण कुटुंबिय वरळी पोलिस ठाण्यात दाखल असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया स्वतः पोलीस ठाण्यात हजर आहेत. लेकीच्या निधनानंतर गाैरीची आई व्याकूळ होऊन रडताना दिसत आहे. वडीलही खूप जास्त व्याकून होऊन म्हणाले की, आता मी काय बोलू माझी लेक गेली आहे.
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेवर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. त्यामध्येच गाैरीने आत्महत्या केली त्यावेळी अनंत तिथेच उपस्थित असल्याचे सांगितले जातंय. मात्र, अनंत गर्जे याने स्पष्ट केले की, ज्यावेळी गाैरीने आत्महत्या केली, त्यावेळी मी घरी नव्हतो. तिने घराची दरवाजे बंद करून आत्महत्या केली. आपण घरात प्रवेश कसा केला हे देखील अनंत गर्जेने सांगितले.
