Mumbai : मुंबई पोलिसांनी 12 तासात 35 लाखांसह फरारी आरोपीला ताब्यात घेतल, इथे कुठे बसला होता लपून..

त्यावेळी तिथं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

Mumbai : मुंबई पोलिसांनी 12 तासात 35 लाखांसह फरारी आरोपीला ताब्यात घेतल, इथे कुठे बसला होता लपून..
फरारी आरोपीला ताब्यात घेतल
महेश घोलप | Updated on: Jan 10, 2023 | 3:53 PM

मुंबई : एका चालकाने आपल्या मालकाचे 35 लाख रुपये घेऊन पोबारा केला होता. ही माहिती मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळताच त्यांना तातडीने त्याचा तपास सुरु केला. त्याचबरोबर बारा तासांच्या आत त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीचं नाव पंकज इंद्रप्रकाश सिंह (pankaj singh) असं आहे. ही माहिती कांदवली (kandivali) पोलिस स्टेशनचे अधिकारी दिनकर जाधव यांनी दिली.

ज्यावेळी तक्रार दाखल झाली होती. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याचबरोबर त्या चालकाचा मोबाईल नंबर ट्रॅक करण्यात आला. त्यावेळी तो कल्याण नाक्याजवळ पोहोचला होता. त्यावेळी तिथं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याची चौकशी केली असता तो त्याच्या गावी जाणार असल्याची माहिती मिळाली.

ज्यावेळी पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी त्याच्याकडे फक्त 27 लाख रुपये मिळाले. इतर आठ लाख रुपये त्याने काय केले, कुठे लपवले हे अद्याप सांगितलेलं नाही. चालकाची पोलिस चौकशी करीत आहेत. एका बांधकाम व्यवसायिकाने जमीन खरेदी केल्यामुळे तो जमीन मालकाला पैसे देण्यासाठी गेला होता. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us