AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Kapoor: ‘माझ्यासाठी रोमान्स महत्त्वाचा…’ 17 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत राहतोय शरद कपूर, लग्नाआधीच झालाय बाप, अभिनेत्याचं खासगी आयुष्य चर्चेत

Sharad Kapoor Latest News: अभिनेता शरद कपूर सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. पण आता अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडबद्दल आणि त्याच्या मुलाची चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Sharad Kapoor: 'माझ्यासाठी रोमान्स महत्त्वाचा...' 17 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत राहतोय शरद कपूर, लग्नाआधीच झालाय बाप, अभिनेत्याचं खासगी आयुष्य चर्चेत
| Updated on: Nov 16, 2026 | 11:51 AM
Share

Sharad Kapoor Latest News: ‘जोश’, ‘लक्ष्य’ आणि ‘जय हो’ यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिकेत झळकलेला अभिनेता शरद कपूर आयुष्यातील कठिण परिस्थितीचा सामना करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये शरद त्याच्या पाळीव कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवताना दिलसा… या व्हिडिओमध्ये शरद खूप अशक्त दिसल्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला असून लोकांकडे मदतीची याचना करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता, खुद्द शरद कपूर याने पुढे येऊन या दाव्यांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे आणि आपल्या आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

एका मुलाखतीत शरद कपूर याने स्पष्ट केलं आहे की, ‘लोकामध्ये अशी चर्चा रंगली आहे की, मला मदतीची गरज आहे. पण मला असं वाटतं की, जोपर्यंत तुम्ही असं म्हणत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला व्ह्यूज मिळत नाहीत. अडचण फक्त एवढीच आहे की, माझं घर साफ करण्यासाठी कोणी नाही. माझी आर्थिक परिस्थिती पूर्णपणे चांगली आहे. मला फक्त काम हवं आहे… काम मागण्यास मला कोणतीच लाज वाटत नाही.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

अभिनेत्याने असं देखील सांगितलं की, क्रिप्टोकरन्सी विकल्यानंतर इन्कम टॅक्स विभागाने अभिनत्याने बँक खाते सील केले आहे. शरद म्हणाला, “मी माझ्या गाड्या विकल्या कारण मला आता त्यांची गरज राहिलेली नाही. सध्या फक्त एकच अडचण आहे की, क्रिप्टोकरन्सी विकल्यानंतर माझे बँक खाते सील झाले आहे. इन्कम टॅक्स विभागाने मला विचारलं की हा पैसा कुठून आला, मी हे देखील सांगितले की तो क्रिप्टोकरन्सीमधून आला आहे, परंतु प्रकरण अद्याप सुटलं नाही. मी या कारवाईविरोधात अपील केली आहे.”

17 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत राहतोय शदर कपूर

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, 50 वर्षांच्या शरद कपूरच्या खासगी आयुष्यातील मोठं सत्य समोर आलं आहे. एका टीमने अभिनेत्याच्या घरात एका महिलेला आणि लहान मुलाला पाहिलं. तेव्हा शरद याने सांगितलं, ती महिला 33 वर्षांची आहे आणि ती माझी गर्लफ्रेंड आहे. पण अभिनेत्याने तिचं नाव सांगितलं नाही.

शदर याने खुलासा केला की, त्यांची भेट चार वर्षांपूर्वी झाली असून गेल्या 2 वर्षांपासून एकत्र राहत आहेत. एवढंच नाही तर, गेल्या महिन्याच अभिनेता लग्नाआधी बाप झाला आहे. गर्लफ्रेंडचं कौतुक करत अभिनेता म्हणाला, ‘ती खूप सपोर्टिव आहे आणि आमचं नात फार चांगलं आहे. माझ्यासाठी रोमान्स फार महत्त्वाचा आहे… यामुळे आयुष्यात एक वेगळी चमक येते. ती आमच्या बाळासोबत घरातील एका भागात राहते, ही जागा कुत्रे राहतात त्या ठिकाणापासून पूर्णपणे वेगळी आहे. असं देखील अभिनेता म्हणाला.

Follow Us
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा