AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामायणनंतर साई पल्लवीचा मोठा निर्णय, आई-वडील रागावले, थेट फोनच केला कट

रामायणमधील सीतेच्या भूमिकेनंतर साई पल्लवीने तिच्या आगामी 'ओम चॅप्टर 1' सिनेमासाठी मोठा निर्णय घेतला. सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेसाठी तिने केस कापले, ज्यामुळे तिचे आई-वडील खूप रागावले आणि त्यांनी थेट फोन कट केला. भूमिकेची गरज असल्याने तिने हे पाऊल उचलले, असे साई पल्लवीने स्पष्ट केले. या सिनेमात ती लाल चंदनाच्या तस्करीचा तपास करताना दिसणार आहे.

रामायणनंतर साई पल्लवीचा मोठा निर्णय, आई-वडील रागावले, थेट फोनच केला कट
Sai PallaviImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 11:46 AM
Share

रामायण या सिनेमातील सीतेची भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. साईने या सिनेमातील भूमिका अत्यंत अप्रतिम रंगवली आहे. सीतेच्या आयुष्यातील चढउताराच्या शेड्स तिने अत्यंत ताकदीने साकारल्या आहेत. त्यामुळे तिच्या या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या सिनेमातील कसदार भूमिकेनंतर साई पल्लवी हिच्याकडे अनेक सिनेमे चालून आले आहेत. तिचा ‘ओम चॅप्टर 1 उधिरम द ब्लड वुड’ हा सिनेमा 20 नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात रिलीज होत आहे. या सिनेमात ती सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. बेकायदेशीरपणे होणाऱ्या लाल चंदनाची तस्करी रोखण्याच्या प्रकरणाचा ती तपास करताना दिसणार आहे.

‘ओम चॅप्टर 1 उधिरम द ब्लड वुड’ या सिनेमासाठी साई पल्लवीने एक मोठा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयाने तिचे आईवडील नाराज झाले होते. एवढेच नव्हे तर तिचे आईवडील तिच्यावर इतके रागावले की त्यांनी तिचा फोनच कट केला. स्वत: साईने या बाबतचा खुलासा केला होता. या सिनेमातील भूमिकेची गरज म्हणून तिने तिचे केस कापले होते. तिला केस शॉर्ट करावे लागले होते. त्यामुळे तिचे आईवडील नाराज झाले होते.

साई काय म्हणाली?

एका वृत्तवाहिनीला साई पल्लवीने मुलाखत दिली होती. त्यात तिने आपल्या रोलबाबत आणि त्यावर आईवडिलांच्या नाराजीबाबत खुलासा केला होता. मी सिनेमाची कथा ऐकली. त्यामुळे मला त्या भूमिकेत कसं शिरता येईल याचा मी विचार केला आणि माझ्या हिशोबाने मी त्या सिनेमात स्वत:ला झोकून दिलं. व्यक्तिरेखेची गरज म्हणून मी माझे केस कापले. मला सिनेमाची कहाणी इतकी आवडली की मी केस कापायलाही तयार झाले. केस कापल्यानंतर मी सर्वात आधी माझ्या आईला व्हिडीओ कॉल करून माझा लूक दाखवला. तिला माझा नवा आवतार पाहून आश्चर्य वाटलं. तिने मला अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडलं. मी असं का केलं? असा जाब विचारला. तिने माझा फोनच कट केला. त्यानंतर माझ्या वडिलाांचा फोन आला. मी विग घातलीय का? असं त्यांनी मला विचारलं. त्यानंतर मी त्यांना सिनेमाची कहाणी, व्यक्तीरेखा या गोष्ट पटवून केस का कापावे लागले हे समजावलं, असं सांगतानाच त्यांना माझ्या या नव्या लूकची सवय व्हायला थोडा वेळ जाईल, असं ती म्हणाली.

दिग्दर्शकावर विश्वास

या सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही एक खास व्यक्तिरेखा होती. त्यामुळे हा लूक ही योग्य निवड होती. सिनेमात आम्ही प्रत्येक हिरोच्या हिशोबाने काही गोष्टी करत असतो. त्यामुळे साई पल्लवीनेही एक प्रकारे केस कापून त्याग केला आहे. कहाणी तिला भावल्यानेच हे शक्य झालं, असं राजकुमार पेरियासामी यांनी म्हटलं आहे. तर, मी राजकुमारवर विश्वास ठेवला. स्क्रिप्टमध्येच हेअरस्टाईलची मागणी होती. त्यामुळे मी ही हेअरस्टाईल केली. कारण सिनेमासाठी हा एकदम योग्यच लूक होता, असं साईने सांगितलं. साईने दिग्दर्शकावर विश्वास ठेवूनच केस कापले. शुटिंगच्यावेळी तिने केस स्कार्फमध्ये गुंडाळले होते. सिनेमा रिलीज होण्याच्या आधी लूक लीक होऊ नये म्हणून तिने काळजी घेतली होती.

काय आहे सिनेमा?

राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित ओम चॅप्टर वन या सिनेमात धनुषने लाकूडतोडणाऱ्याची भूमिका साकारली आहे. खरं तर तो या सिनेमात एका बड्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. पण आरोपींना पकडण्यासाठी तो लाकूडतोड्याचा वेष घेतो. या सिनेमात मामुटी खलनायक साकारणार आहेत. या सिनेमात श्रीलीला आणि संजय स्वरुपही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात सर्वात महत्त्वाच्या भूमिके नसीरुद्दीन शाह दिसणार आहेत. नसीरुद्दीन शाह यांचा हा पहिलाचा तामिळ सिनेमा आहे.

Follow Us
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...