AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. (Pooja Chavan Arun Rathod detain)

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात
अरुण राठोड आणि पूजा चव्हाण
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 18, 2021 | 11:43 AM
Share

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला (Arun Rathod) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे. (Pooja Chavan Suicide Case Suspect Arun Rathod detain by Pune Police)

चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला. पोलीस अहवालात विजय चव्हाणहीसोबत असल्याचा उल्लेख आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत. याप्रकरणात एकूण तीन पथकं चौकशी करत आहेत. याअगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल नाही, आकस्मिक मृत्यूचीच नोंद पोलीस दप्तरी आहे.

पूजा अरुण राठोडचा गर्भपात

दरम्यान, काल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला होता. पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण? पूजा अरुण राठोड हिचा पूजा चव्हाणशी काय संबंध? पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले.

रिपोर्टमध्ये काय?

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळचा हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टवर इंग्रजीत ड्राफ्ट कॉपी असं लिहिलं असून त्या खाली शॉर्ट केस रेकॉर्ड असं लिहिलं आहे. रिपोर्टवर प्रिंट दिनांक 17 फेब्रुवारी 2021 लिहिलं आहे. वेळ दुपारी 1.47 वाजताची लिहिली आहे. तर सेव्हड तारीख 12 फेब्रुवारी 2021 लिहिली असून वेळ संध्याकाळ 7.29 वाजताची लिहिली आहे. तसेच 6 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 वाजून 34 मिनिटांनी रुग्णालयात भरती केल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे पूजा अरुण राठोड या तरुणीवर 6 फेब्रुवारी रोजी उपचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. वॉर्ड नंबर 3 मध्ये या महिलेला अॅडमिट करण्यात आलं असून युनिट नंबर 2 मध्ये ही तरुणी उपचार घेत असल्याचंही त्यावर नमूद करण्यात आलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये कोणत्याही गुंतागुंतीशिवाय या महिलेचा गर्भपात करण्यात आल्याचंही त्यात स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले. (Pooja Chavan Suicide Case Suspect Arun Rathod detain by Pune Police)

पोस्टमार्टम अहवाल काय म्हणतो?

पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजाने आत्महत्या केल्याचं म्हटलेलं नाही.

ऑडिओ क्लिपमधून उलगडा ?

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधित आहेत का, याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलिसांनी दिली, ना पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचं समजतं.

संबंधित बातम्या :

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार

पूजा चव्हाणला नेमकं काय झालं होतं? ती स्ट्रीप रेड का झाली?; कथित मंत्री का घाबरला?

पुजा आणि कथित मंत्र्यांचा शेवटचा संवाद कोणता? मंच्युरियन, ज्यूस आणि बरंच काही, ऐका, वाचा !

(Pooja Chavan Suicide Case Suspect Arun Rathod detain by Pune Police)

Follow Us
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया