पूजा अरुण राठोड कोण?, मेडिकल रिपोर्ट काय सांगतो?, नांदेडशी कनेक्शन काय?; वाचा सविस्तर रिपोर्ट!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. (who is pooja arun rathod? what medical report says? read report)

पूजा अरुण राठोड कोण?, मेडिकल रिपोर्ट काय सांगतो?, नांदेडशी कनेक्शन काय?; वाचा सविस्तर रिपोर्ट!
पूजा चव्हाण


यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण? पूजा अरुण राठोड हिचा पूजा चव्हाणशी काय संबंध? पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. पूजा अरुण राठोडचा मेडिकल रिपोर्ट नेमका काय सांगतो? काय आहे हे प्रकरण यावर टाकलेला हा प्रकाशझोत. (who is pooja arun rathod? what medical report says? read report)

रिपोर्ट काय आहे?

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळचा हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टवर इंग्रजीत ड्राफ्ट कॉपी असं लिहिलं असून त्या खाली शॉर्ट केस रेकॉर्ड असं लिहिलं आहे. रिपोर्टवर प्रिंट दिनांक 17 फेब्रुवारी 2021 लिहिलं आहे. वेळ दुपारी 1.47 वाजताची लिहिली आहे. तर सेव्हड तारीख 12 फेब्रुवारी 2021 लिहिली असून वेळ संध्याकाळ 7.29 वाजताची लिहिली आहे. तसेच 6 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 वाजून 34 मिनिटांनी रुग्णालयात भरती केल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे पूजा अरुण राठोड या तरुणीवर 6 फेब्रुवारी रोजी उपचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. वॉर्ड नंबर 3 मध्ये या महिलेला अॅडमिट करण्यात आलं असून युनिट नंबर 2 मध्ये ही तरुणी उपचार घेत असल्याचंही त्यावर नमूद करण्यात आलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये कोणत्याही गुंतागुंतीशिवाय या महिलेचा गर्भपात करण्यात आल्याचंही त्यात स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे.

नांदेडचा पत्ता

या पेपरवर रुग्णाचं नाव पूजा अरुण राठोड असं लिहिलं आहे. या महिलेचं वय 22 वर्षे लिहिण्यात आलं असून उत्पन्न निरंक दाखवण्यात आलं आहे. तसेच जननी शिशू सुरक्षा योजनेअंतर्गत तिच्यावर उपचार करण्यात आल्याचं नमूद केलं आहे. गुरुवार आणि शुक्रवारी तिच्यावर उपचार झाल्याचंही त्यावर लिहिलं आहे. म्हणजे ती या रुग्णालयाच्या ओपीडीत दोन दिवस होती हे स्पष्ट होतं. सर्वात लक्षवेधक बाब म्हणजे यावर नांदेडचा पत्ता देण्यात आला आहे. शिवाजीनगर, नांदेड असा पत्ता त्यावर आहे. पूजा चव्हाण आणि अरुण राठोड हे मूळचे बीड जिल्ह्यातील परळीचे आहेत. हे दोघेही पुण्यात वास्तव्याला होते. या संपूर्ण प्रकरणात नांदेडचा कुठेच उल्लेख आलेला नाही. परंतू या केस पेपरवर नांदेडचा उल्लेख आल्याने पूजा अरुण राठोड नावाची तरुणी नांदेडच्या शिवाजी नगरात वास्तव्याला आहे का? असेल तर नांदेड किंवा औरंगाबादला उपचार घ्यायला जायचं सोडून ही महिला विदर्भात यवतमाळमध्ये उपचारासाठी का आली? पूजा अरुण राठोडचं नांदेडशी काय कनेक्शन आहे? असे सवाल निर्माण झाले आहेत.

डॉक्टरांची सही नाही

या रिपोर्टवर असोसिएट प्रोफेसर आणि हेड ऑफ द युनिट म्हणून डॉ. श्रीकांत वराडे यांचं नाव आहे. तसेच वराडे यांनी या रुग्णावर उपचार केल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. मात्र, त्यावर सही नाही. डॉ. वराडे यांनीही शुक्रवारचं अॅडमिशन असल्याने माझं नाव आलं असेल पण या रुग्णावर मी उपचार केले नसल्याचं ऑन कॅमेरा स्पष्ट केलं आहे. वराडे यांनी जर या रुग्णावर उपचार केले नाही तर त्यांचं नाव पेपरवर कसं टाकण्यात आलं? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

दोन्ही अरुण राठोड एकच आहेत का?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोडचं नाव आलं आहे. हा अरुण राठोड बीडचा असून वन मंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यवतमाळमधील अरुण राठोड याचा पत्ता शिवाजी नगर, नांदेड असा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणातील अरुण राठोड एकच आहेत की दोन्ही वेगळे आहेत? असा सवाल निर्माण झाला आहे.

‘त्या’ व्हायरल क्लिपमध्ये काय संभाषण झालं होतं?

पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर एकूण 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यात अरुण चव्हाण आणि कथित मंत्र्याचं कथित संभाषण होतं. त्यात पूजाच्या उपचाराबाबत दोघांनीही चर्चा केली होती. ट्रिटमेंट घेतल्यानंतर आत्महत्या करणार असल्याचं पूजाने या अरुणला सांगितलं होतं. तसेच पूजाने एक किट आणून काही तपासणी केली होती. ती किट पॉझिटिव्ह आल्यानंतर अरुण घाबरला होता. त्यामुळे पूजावर नेमका कोणता उपचार सुरू होता? अरुण का घाबरला होता? असा असा सवालही केला जात आहे. (who is pooja arun rathod? what medical report says? read report)

कथित संभाषण जसंच्या तसं

व्हायरल क्लिपपैकी चार नंबरच्या क्लिपमध्ये दोघेही मराठीत बोलत आहेत. त्यात पूजाच्या ट्रीटमेंटच्या अनुषंगानेच चर्चा सुरू असल्याचं दिसतं.

अरुण: सुसाईडचं वेड तिच्या डोक्यातून काढा.
मंत्री: ठिक आहे. काय करावं आता.
अरुण: तेच तिच्या डोक्यातून काढा. सुसाईड हा पर्याय नाही. खूप आयुष्य आहे अजून.
मंत्री: तेच तर सांगत आहे तिला मी.
अरुण: ती कितीतरी मुलींची आयडॉल आहे. तिच्या सारखं बनायला बघतात पोरी. सुसाईड करतेय म्हटल्यावर अवघड आहे.
मंत्री: हम्म
अरुण: असं थोडीच असतं.
मंत्री: तू कुठे आहे? बाहेर आहे का? ये ना.
अरुण: तुम्ही बोला.
मंत्री: काय बोलू तिला. एवढं क्लिअर बोलूनही त्याच मुद्द्यावर असेल तर…
अरुण: त्या दिवशीपासून सांगतो ट्रिटमेंट करू, नाहीच म्हणत होती. आज म्हणाली, तू आणि ते सांगतात तर ट्रिटमेंट करते. पण नंतर इलाज केल्यावर सुसाईड करेल म्हणते. असं थोडीच असतं.
मंत्री: हम्म
नंतर बराच गॅप जातो. संभाषण थांबतं.
अरुण: असं थोडीच असतं. तुम्ही काढा तिच्या डोक्यातून.
मंत्री: हम्म. तुला काय म्हणत होती ती. काही तरी म्हटली ना. काही तरी आणून दे म्हणून… कशाला सांगितलं तू?
अरुण: कशाला म्हणजे? गरजेचं आहे सांगणं. असं थोडीच असतं. सुसाईड म्हणजे काय…
मंत्री: ठिक आहे. तू कुठे आहे, इथेच आहे ना?
अरुण: हां इथेच आहे. डोक्यातून काढा तिच्या तेवढं सुसाईडचं. सुसाईड हा ऑप्शन नाही हे ना.

मंत्री: हो
अरुण: ठेवू

या दोघांमधील हा संवाद दोन मिनिटं 24 सेकंदाचा आहे. त्यात दोघंही पूजाच्या आत्महत्येबाबत चर्चा करत आहेत. अरुण हा पूजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कथित मंत्र्याला पोटतिडकीने गळ घालत आहे. (who is pooja arun rathod? what medical report says? read report)

क्लिप सातवी

ही 12 मिनिटाची क्लिप आहे. या क्लिपमध्ये मंत्री वैतागलेले दिसत आहेत. टेन्शनमध्ये असल्याचं ते सांगत आहेत.
मंत्री: मला एक तर टेन्शन… टेन्शन आलंय. आधीच मी परेशान आहे. घराचं टेन्शन आहे. समजव तिला. तूच तिला कन्व्हिन्स करू शकतो.
अरुण: काही तरी मार्ग काढावा लागेल.
मंत्री: कन्व्हिन्स कर तू.
अरुण: कन्व्हिनस करावं लागेल, अवघड विषय आहे,. मागे लागेल… मी जातो आणि व्यवस्थित बोलतो.
मंत्री: ठिक आहे. तू कर नंतर मी येतो.
त्यानंतर या दोघांमध्ये मुलीच्या ट्रिटमेंटबाबत चर्चा सुरू होते. त्यावर अरुण ही मुलगी सर्किट असल्याचं सांगतो. मग मंत्री तिला गोडीत समजावण्याचं अरुणला सल्ला देतात. त्यावर हा बदनामीचा धंदाच आहे, असं अरुण म्हणतो. अरुणच्या या उत्तराने मंत्री अधिकच वैतागतात. माझ्या घरी काय चालू आहे माझं मलाच माहीत. घर डिस्टर्ब झालंय माझं. मला माहीत मी किती परेशान आहे. तिला समजाव तू, असं हा मंत्री म्हणतो. त्यावर तुमचं रेप्युटेशन आहे. हे तिला कळलं पाहिजे, असं अरुण म्हणतो.
मंत्री: मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.
अरुण: तुम्ही काही करणार नाही. मी बघतो परिस्थिती हाताळतो.
मंत्री: तूच काही तरी कर, मी काही करत नाही.
अरुण: मी करतो कन्व्हिन्स

काही वेळाने पुन्हा संवाद सुरू होतो.

अरुण: तिने किट आणली आणली आणि टेस्ट केली. रेड पट्टी झाली. पॉझिटीव्ह आली. एकदमच धडधड झाली. काय करू आणि काय नको असं झालं. घामच फुटला. रुममध्ये आल्यावर कालच माझं आधार कार्ड घेतलं होतं. तिला समजून सांगणं गरजेचं आहे. नाही तर ती भलतीच माथेफिरू… सायको आहे. तिला एकदम कन्व्हिन्स केलं पाहिजे.

मंत्री: हे सगळं झालं की इतक्या लांब जाईल की मला स्वप्नातही दिसलं नाही. म्हटलं तुझं स्वप्नं कर पूर्ण. पण ती दुसऱ्याच मार्गावर गेली. त्यात माझी थोडीच चूक आहे. माझी प्रतिमा… माझी इज्जत…हां… माझ्यामागे एवढा समाज आहे.

अरुण: लोकांना काय विषय चघळायला पाहिजे

मंत्री: मला तर काही कळतच नाही. मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.

अरुण: तुम्हाला काही होणार नाही. टेन्शन घेऊ नका. मी करेल सर्व बरोबर. मी समजावतो ना नंतर.

मंत्री: तू आधी सगळं सांभाळ. मी येतो नंतर…

अरुण: ठिक आहे. (who is pooja arun rathod? what medical report says? read report)

संबंधित बातम्या:

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम

मोठी बातमी : श्रीमती पूजा अरुण राठोडचा यवतमाळमध्ये गर्भपात!

(who is pooja arun rathod? what medical report says? read report)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI