AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुम नंबर 306 मध्ये खुनी थरार… रक्त, पिस्तुल आणि तरुणी, पुणं पुन्हा हादरलं

पुण्यातील एका हॉटेलच्या रूममध्ये एका तरूणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या त्या तरूणीची तिच्याच प्रियकराने हत्या केली. एकाच गावचे रहिवासी असलेले दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मात्र ती आपल्याला सोडून जाईल या भीतीने...

रुम नंबर 306 मध्ये खुनी थरार... रक्त, पिस्तुल आणि तरुणी, पुणं पुन्हा हादरलं
| Updated on: Jan 30, 2024 | 11:30 AM
Share

पुणे | 30 जानेवारी 2024 : पुणे शहरात एमपीएससी पास तरुणी दर्शना पवार हिची हत्या काही महिन्यांपूर्वीच झाली होती. आता पुन्हा प्रेमप्रकरणातून आयटी अभियंता असणाऱ्या महिलेची तिच्या प्रियकराकडून हत्या झाली आहे. पुण्यातील एका हॉटेलमधी खोलीत तरूणीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. वंदना द्विवेदी (वय 26) असं मृत तरूणीचं नाव असून ती सॉफ्टवेअर इंजिनीअर होती. २६ जानेवारीला एक हॉटेलमध्ये तिचा मृतदेह सापडला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी तिच्या मारेकऱ्याचा शोध लावत त्याला अटक केली. तो दुसरा-तिसरा कोणी नसून तिचाच प्रियकर होता. वंदना ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी होती. गेल्या दोन वर्षांपासून ती पुण्यातील हिंजेवाडी येथे इन्फोसिस कंपनीत काम करत होती. तर ऋषभ निगम असे आरोपीचे नाव असून तोही लखनऊचाच रहिवासी होता.

रिपोर्ट्सनुसार, शनिवारी रात्री आरोपीने हिंजवडीतील लक्ष्मीनगर भागातील एका खासगी हॉटेलच्या 306 क्रमांकाच्या खोलीत वंदनाची गोळया घालून हत्या केली. आणि तो फरार झाला. मात्र दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खोलीत मृतदेह सापडल्याने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि त्यांनी तातडीने तपास सुरू केला.

पिस्तुलासह आरोपीला केली अटक

आरोपी ऋषभ निगम हा देखील मूळचा लखनऊचा रहिवासी आहे. वंदनाच्या खुनानंतर फरार झालेल्या आरोपीला नवी मुंबई येथून अटक करण्यात आली आणि त्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाकडे सोपवण्यात आले. त्याच्या ताब्यातून एक पिस्तुलही जप्त करण्यात आली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वंदना द्विवेदी आणि निगम लखनऊमध्ये एकाच भागात राहत होते आणि 2014 पासून एकमेकांना ओळखत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांचं नातं होतं, मात्र काही काळापासून वंदना आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ती सोडून जाईल अशी भीती ऋषभला वाटत होती. त्यामुळेच त्यांच्यात वाद झाले.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

वंदनाचा खून केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वंदना द्विवेदी यांच्या हत्येमागचे खरे कारण जाणून घेण्यासाठी आरोपीची चौकशी करण्यात आली. वंदनाचे इतर प्रेम संबंध असल्याचा संशयही आरोपीला होता.

आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आरोपी ऋषभ निगमने एका खासगी हॉटेलमध्ये 306 क्रमांकाची खोली बुक केली. 27 जानेवारी रोजी वंदना द्विवेदी हिची त्याने त्या हॉटेलच्या खोलीत भेट घेतली. मात्र रात्री त्यांच्यात जोरदार वादावादी झाली, यामुळे संतापलेल्या आरोपीने वंदना द्विवेदी हिच्या छातीत आणि डोक्यात गोळ्या झाडून तिची हत्या केली. रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी फरार झाला. बऱ्याच काळापासून त्यांच्यात वाद सुरू होते, असे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. हत्या करण्यासाठी ऋषभ याने बंदूक कुठून आणली ? याचा तपास हिंजवडी पोलिसांनी सुरू केला आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच