AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहर पुणे, परिसर भारती विद्यापीठ, एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना

एकाच परिसरात तीन वेगवेगळ्या आत्महत्येच्या घटनांमुळे खळबळ उडाली असून सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. ( Pune Suicide Bharti University Area)

शहर पुणे, परिसर भारती विद्यापीठ, एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना
पुण्यात एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 21, 2021 | 11:47 AM
Share

पुणे : पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना समोर आल्या आहेत. 35 वर्षीय वाहनचालकाने बेरोजगारीतून आयुष्य संपवलं. चाळीस वर्षीय व्यक्तीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. राजीव गांधी उद्यानासमोर एकाने आपल्या आयुष्याची अखेर केली. (Pune Crime Three People allegedly committed Suicide in Bharti University Area)

35 वर्षीय कार ड्रायव्हरची आत्महत्या

35 वर्षीय निरंजन बाळकृष्ण साळुंखे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो वंडर सिटीजवळ वर्धापन बिल्डिंगमध्ये राहत होता. निरंजन हा वाहन चालक म्हणून काम करत होता. मात्र गेल्या महिन्यांपासून त्याच्याकडे रोजगार नव्हता. मित्र निरंजनला दररोज जेवणाचा डबा आणून देत असे. सोमवारी दुपारी डबा घेऊन आला असता त्याला निरंजनने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्याने उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

40 वर्षीय व्यक्तीनेही आयुष्य संपवलं

दुसरीकडे, चाळीस वर्षीय पोपट पांडुरंग सलगर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो सुखसागर नगर परिसरातील रहिवासी होती. त्याची मुलं गावाला, तर पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

उद्यानासमोर तरुणाचा गळफास

राजीव गांधी उद्यानासमोर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचेही उघड झाले. त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी, मोबाईल न सापडल्याने या व्यक्तीची ओखळ पटू शकली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. एकाच परिसरात तीन वेगवेगळ्या आत्महत्येच्या घटनांमुळे खळबळ उडाली असून सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

पत्नी-मुलाची हत्या करुन तरुणाची आत्महत्या

दरम्यान, 28 वर्षीय पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना गेल्याच आठवड्यात समोर आली होती. बेरोजगारीला कंटाळून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती.

हनुमंत शिंदे असं पत्नी-मुलाची हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या पतीचं नाव आहे. हनुमंतने 28 वर्षीय पत्नी प्रज्ञा शिंदे आणि एक वर्षांचा मुलगा शिवतेज शिंदे यांची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर हनुमंतने गळफास घेत स्वतःचंही आयुष्य संपवलं. यामुळे शिंदे कुटुंब राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात तरुणावर टोळक्याचा कोयता हल्ला, शेजारच्या रहिवाशांनी घरात घेतल्याने तरुण बचावला

28 वर्षीय पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची हत्या, पुण्यात पतीची गळफास घेऊन आत्महत्या

(Pune Crime Three People allegedly committed Suicide in Bharti University Area)

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...