पुण्यात तरुणावर टोळक्याचा कोयता हल्ला, शेजारच्या रहिवाशांनी घरात घेतल्याने तरुण बचावला

जखमी सुमित नाना वैराटला तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Pune Man Attacked by Knife)

पुण्यात तरुणावर टोळक्याचा कोयता हल्ला, शेजारच्या रहिवाशांनी घरात घेतल्याने तरुण बचावला
तरुणावर कोयता हल्ला

पुणे : नऱ्हेगावात अज्ञात टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये 32 वर्षीय सुमित नाना वैराट हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अंगावर वार होत असताना जवळच्या इमारतीत असणाऱ्या रहिवाशाने सुमितला घरात घेतल्यामुळे तो बचावला. पूर्ववैमस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Pune Man Attacked by Gang with Knife at Narhe Gaon)

सुमित नाना वैराटला तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झील कॉलेज चौकात घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाले आहेत.

आठ ते दहा जणांच्या टोळक्याचा हल्ला

नऱ्हेगावातील झील कॉलेज चौकातील रस्त्यावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा अज्ञात तरुणांनी एकत्र जमून सुमित वैराट या तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. अंगावर वार होत असताना जवळच्या इमारतीत असणाऱ्या एका व्यक्तीने जखमी अवस्थेत सुमितला घरात घेऊन दरवाजा लावल्याने त्याचा जीव वाचला.

पूर्ववैमस्यातून कोयता हल्ल्याचा अंदाज

सुमितला उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूर्ववैमस्यातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाले असून दोन आरोपींना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दोघे ताब्यात, इतर पसार

घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, कुलदीप संकपाळ या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली असून सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

टोल नाक्याचा पैसा लंपास करण्यासाठी थेट कर्मचाऱ्यावर हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद

VIDEO : पुण्यात भर दिवसा रस्त्यावर तरुणाची कोयत्याने हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

(Pune Man Attacked by Gang with Knife at Narhe Gaon)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI