AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : पुण्यात भर दिवसा रस्त्यावर तरुणाची कोयत्याने हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

चाकण औद्योगिक वसाहतीतील म्हाळुंगे येथे चार ते पाच तरुणांनी मिळून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आलीय (four to five people killed youth in Pune)

VIDEO : पुण्यात भर दिवसा रस्त्यावर तरुणाची कोयत्याने हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
| Updated on: May 20, 2021 | 10:02 PM
Share

पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीतील म्हाळुंगे येथे चार ते पाच तरुणांनी मिळून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली होती. आरोपींनी तरुणावर कोयत्याने वार केल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली. मृतक मुलाचे नाव अतुल भोसले असल्याचं समोर आलं आहे. अतुलवर भर रस्त्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला होता. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे (four to five people killed youth in Pune).

नेमकं प्रकरण काय?

पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहत परिसरामध्ये अनेक लहान-मोठे उद्योग सुरू आहेत. याच उद्योगांना लागणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या कारणावरून तरुणावर  लोखंडी कोयत्याने वार करत जीवे मारण्याची घटना समोर आले आहे. या हल्ल्यात अतुल भोसले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे (four to five people killed youth in Pune).

दोन ते तीन दिवसापूर्वी मयत अतुल भोसले आणि आरोपी अक्षय शिवले या दोघांमध्ये चाकण औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये पाणी टँकर पुरवण्याच्या कारणावरून फोनवर वादावादी झाली होती. त्याच कारणावरून चिडून आरोपी अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव यांनी दोन ते तीन साथीदारांच्या मदतीने मयत अतुल भोसले याला लोखंडी कोयत्याने जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

संबंधित घटना ही म्हाळुंगे येथे भर रस्त्यावर घडली. चार ते पाच जण कोयत्याने अतुलला मारहाण करत होते. ते कोयत्याने त्याच्यावर हल्ला करत होते. यावेळी रस्त्यावर वर्दळ होती. रस्त्याने गाड्यांती ये-जा सुरु होती. मात्र, कुणीही मध्यस्ती करुन तरुणाला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही.

हल्लेखोर फरार, पोलिसांकडून शोध सुरु

संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या अतुल भोसलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तसेत गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तपास सुरु केलाय. मात्र, आरोपी अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि त्यांचे दोन ते तीन साथीदार फरार आहेत.

संबंधित घटनेचा थरार बघा :

हेही वाचा :

सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली, कोरोना काळात पुण्यातील धक्कादायक प्रकार

अहमदनगरमध्ये पुन्हा हनी ट्रॅप, बिझनेसमनचा अश्लील व्हिडीओ बनवून 1 कोटीची खंडणी

चौकावर हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी सापळा रचत पकडलं, कुख्यात गुंडांना बेड्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.