चौकावर हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी सापळा रचत पकडलं, कुख्यात गुंडांना बेड्या

नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत 3 हार्डकोर गुन्हेगारांना शस्त्रासह अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे (Police arrest three accused who tried to terrorise with weapons in their hands)

चौकावर हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी सापळा रचत पकडलं, कुख्यात गुंडांना बेड्या
तीन आरोपी तलवारी घेऊन वेगवेगळ्या चौकांवर, हातात शस्त्र घेऊन दहशतीचा प्रयत्न, पोलिसांकडून वेळीच जेरबंद
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:51 AM

नागपूर : नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत 3 हार्डकोर गुन्हेगारांना शस्त्रासह अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. हे गुन्हेगार वेगवेगळ्या भागात शस्त्र घेऊन फिरत. लोकांसमोर हातात शस्त्र दाखवून दहशत पसरविण्याच काम करत होते. मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या या कारवाईचं शहरात कौतुक केलं जात आहे. संबंधित आरोपीचं दहशत माजविण्यामागे काय उद्देश होता, ते कुठला कारनामा करणार होते याचा शोध पोलीस घेत आहेत (Police arrest three accused who tried to terrorise with weapons in their hands).

पोलिसांनी कारवाई कशी केली

यशोधरा नगर भागात काही गुन्हेगार शस्त्र घेऊन दहशत माजवत फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पेट्रोलिंग व्हॅनच्या साहाय्याने या आरोपीनाचा शोध घेतला आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. यापैकी दोन जण तलवार घेऊन तर एक चाकू हातात घेऊन फिरत होता. यातील दोन आरोपी हे कुख्यात गुंड आहेत तर एक नवीन आहे. मात्र तिघंही शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवत होते. त्यांच्याकडून शस्त्र आणि इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

या घटनेबाबत यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अशोक मेश्राम यांनी प्रतिक्रिया दिली. “माझा नाईट राऊंट होता. दरम्यान रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील तीन वेगवेगळ्या चौकांवर तीन इसम प्राणघातक शस्त्र घेऊन फिरत आहेत, अशी माहिती मिळाली. त्या माहितीची आम्ही खात्री केली. त्यानंतर तिन्ही ठिकाणी पथकं रवाना केले. त्यानंतर ते तीनही संशयित असून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं लक्षात आलं”, असं मेश्रान यांनी सांगितलं.

“आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झालो. त्या तीनही आरोपींना पकडलं. त्यांची झळती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे सापडले. तीनही आरोपींवर आम्ही कारवाई केली आहे. त्यांनी तलवारी, चाकू नेमके कुठून आणले याचा तपास सुरु आहे”, असं अशोक मेश्राम यांनी सांगितलं.

नागपुरात एकाच दिवशी दोन हत्येच्या घटना

नागपुरात वारंवार गुन्हेगारीच्या घटना समोर येत असतात. शहरात दोन दिवसांपूर्वी सहा तासांच्या फरकात दोन हत्येच्या घटना समोर आल्या होत्या. यामध्ये एका कुख्यात गुन्हेगाराच्या हत्येची घटना समोर आली होती. ही हत्या सकाळी साडे दहा वाजता भर दिवसा करण्यात आली होती. तर दुसरी हत्येची घटना ही एका सोसयटीतील घरात करण्यात आली होती. विशेष म्हणजे 62 वर्षीय वृद्धेची ही हत्या करण्यात आली होती. मृतक महिलेच्या अंगावरील दागिने आणि घरातील मौल्यवान वस्तू जसेच्या तसे असल्याने ही हत्या लुटेच्या कारणाने करण्यात आली नसल्याचं प्रथमदर्शा समोर आलं होतं.

हेही वाचा : 

भर दिवसा रस्त्यावर थरार, दोन गुंड आमनेसामने, दोघांमध्ये संघर्ष, तडीपार गुंडाची हत्या

घरातील महागड्या वस्तू, अंगावरील दागिने जशास तसे, तरीही वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात, आरोपींनी महिलेला का मारलं?

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.