भर दिवसा रस्त्यावर थरार, दोन गुंड आमनेसामने, दोघांमध्ये संघर्ष, कुख्यात गुंडाची हत्या

भर दिवसा रस्त्यावर थरार, दोन गुंड आमनेसामने, दोघांमध्ये संघर्ष, कुख्यात गुंडाची हत्या
दोन कुख्यात गुंड आमनेसामने, भर दिवसा दोघांमध्ये संघर्ष, तडीपार गुंडाची हत्या, नागपूर हादरलं !

नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत कुख्यात गुंड शहानवाजची हत्या करण्यात आली (Gangster murder in Nagpur)

चेतन पाटील

|

May 20, 2021 | 9:25 PM

नागपूर : नागपुरात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना गुन्हेगारिच्या घटना देखील सुरुच आहेत. शहरातील महाल परिसरातील एका कुख्यात गुंडाची (Gangster murder in Nagpur) भर दिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलीय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना महामारीच्या संकटात एकीकडे शेकडो नागरिकांचा बळी जात असताना हत्येच्या या घटनेने नागपूर हादरलं आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा काही वचक राहिलेला आहे की नाही? असा सवाल या घटनेतून पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय (Gangster murder in Nagpur).

नेमकं प्रकरण काय?

नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत कुख्यात गुंड शहानवाजची हत्या करण्यात आली. आरोपीने चाकूने वार करत हत्या केली. मृतक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तडीपार आरोपी होता. जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतसं असून तपास सुरू केला आहे.

मृतक आणि आरोपीत भर दिवसा संघर्ष

मृतक आणि आरोपी महाल परिसरातील शिवाजी पुतळ्या जवळील रोडवर सकाळी 10.30 च्या सुमारास आमनेसामने आले. त्यांच्यात जोरदार भांडण झालं. आरोपीने धारदार शस्त्राने मृतकावर हल्ला चढविला. त्यात मृतक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलं.

मृतकाचे आरोपीसोबत जुने वाद

मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याला तडीपार सुद्धा करण्यात आलं होतं. त्याचे आरोपीसोबत जुने वाद होते. त्यातून ही हत्या घडली असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी आता या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, महाल परिसरात घडलेली ही हत्या जुन्या वादातून झाली असली तरी यातून नवीन वाद पुढे येऊन वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता पोलिसांवरील जबाबदारी वाढली आहे.

हेही वाचा :

धक्कादायक! सूनेसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून बापाने केली मुलाची हत्या

उधारीवरुन मित्रांमध्ये वाद, भरचौकात सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची हत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें