उधारीवरुन मित्रांमध्ये वाद, भरचौकात सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची हत्या

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात भरदुपारी गर्दीने गजबलेल्या चौकात हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे (Chandrapur Man Kills Friend)

उधारीवरुन मित्रांमध्ये वाद, भरचौकात सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची हत्या
Chandrapur Murder

चंद्रपूर : उधारीची रक्कम देण्यावरुन झालेल्या वादावादीनंतर मित्रानेच तरुणाचा जीव घेतला. भाजी कापण्याच्या तीक्ष्ण सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात भर दुपारी भर चौकात झालेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Chandrapur Man allegedly Kills Friend over Fight on borrowed money)

एक हजार रुपयांच्या उधारीवरुन वाद

उधारीवर घेतलेल्या एक हजार रुपयांच्या कारणावरुन मित्रानेच भाजी कापण्याच्या सुरीने 26 वर्षीय सुकराम अलाम याच्यावर भर गर्दीत वार केले. त्यानंतर 21 वर्षीय आरोपी निलेश ढोक याने स्वतः जखमी मित्राला रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीला रुग्णालयातच अटक करण्यात आली.

गर्दीने गजबलेल्या चौकात चाकूहल्ला

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात भरदुपारी गर्दीने गजबलेल्या चौकात हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. निलेश ढोक याने आपला मित्र सुकराम याला 1 हजार रुपये उसने दिले होते. मात्र सुकराम ते परत देत नव्हता.

जखमी मित्राला स्वतःच रुग्णालयात नेले

या कारणाने संतापलेल्या निलेशने भाजी कापण्याच्या धारदार सुरीने सुकराम अलाम याची गर्दी असलेल्या गांधी चौकात वार केले. आरोपी निलेश ढोकने हत्या केल्यावर स्वतः जखमी मित्राला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीला रुग्णालयात जाऊन बेड्या ठोकल्या.

इचलकरंजीत मित्रानेच दगडाने ठेचून संपवलं

दारुच्या नशेत वादावादी झाल्याने मित्रानेच दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना काल कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यात घडली होती. राजू वसंत जाधव (34) असे मयत तरुणाचे नाव आहे. दारुच्या अड्ड्यावर झालेल्या वादावादीचं हाणामारीत रुपांतर झालं. मित्राने राजू जाधव याच्या डोक्यात दगडाने घाव घातला.

संबंधित बातम्या 

पत्नीचे मसाज पार्लरमधील ग्राहकाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीची भलतीच करामत

सूनेसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून बापाने केली मुलाची हत्या

(Chandrapur Man allegedly Kills Friend over Fight on borrowed money)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI