धक्कादायक! सूनेसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून बापाने केली मुलाची हत्या

सून आणि सासऱ्याने दोघांनी मिळून केलेल्या हत्याकांडाने राजस्थानमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस तपासात बुधवारी या घटनेचा खुलासा झाला. (The father killed his son as he did not want to interfere in his immoral relationship with his daughter-in-law)

धक्कादायक! सूनेसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून बापाने केली मुलाची हत्या
सूनेसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून बापाने केली मुलाची हत्या
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 12:21 AM

नवी दिल्ली : कोरोना महामारीने जगाला मोठा धडा दिला आहे. माणुसकी, नाती जपण्याचा संदेश दिला आहे. मात्र या संकटात गुन्हेगारी प्रवृत्ती कायम राहिली आहे. लोकांना अजूनही नात्याची किंमत कळली नसल्याचे राजस्थानातून एका घटनेवरून उजेडात आले आहे. नात्याला कलंक लावणारी घटना राजस्थानच्या जैसलमेर शहरात घडली आहे. आपल्या सूनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याने आपल्या तरुण मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा मागील 15 दिवस कुणालाच मागमूस लागलेला नाही. सून आणि सासऱ्याने दोघांनी मिळून केलेल्या हत्याकांडाने राजस्थानमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस तपासात बुधवारी या घटनेचा खुलासा झाला. (The father killed his son as he did not want to interfere in his immoral relationship with his daughter-in-law)

काय म्हणाले पोलीस?

पोलिसांनी सांगितले की, हत्या झालेल्या पुरुषाच्या पत्नीने पतीला लिंबू सरबत दिले होते. त्या सरबतमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. नंतर दोघांनी करंट लावून हत्याकांड केले. मुलाला विजेचा धक्का लागला, त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आरोपी सासऱ्याने सर्वांना सांगितले. पोलिसांना या घटनेची खबर मिळताच त्यांनी अधिक तपास सुरू केला. या तपासातून धक्कादायक खुलासा झाला आहे. नाचना पोलिस डीसीपी हुकुमार राम बिष्णोई यांनी या हत्याकांडाबाबत विस्ताराने माहिती दिली. तरुणाच्या हत्येचा त्याची पत्नी आणि पित्याने पद्धतशीर कट रचला होता. तरुणाला रात्री झोपण्यापूर्वी लिंबाचा सरबत दिले. त्यात टाकलेल्या झोपेच्या गोळ्यांमुळे तरुण बेशुद्ध झाला. तो बेशुद्धावस्थेत गेल्यानंतर दोघांनी विजेचा करंट लावला. आरोपी सासऱ्याने आपल्या मुलाला कायमची झोप दिली. नंतर आपले गुन्हेगारी कृत्य लपवण्यासाठी सकाळी-सकाळीच मुलाचे अंत्यसंस्कार केले.

अशी उलगडली हत्या

हिरालाल असे मृत तरुणाचे नाव आहे. हिरालालच्या मृत्यूबाबत संशय आल्यानंतर त्याच्या छोट्या भावाने वहिनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांनी अधिक तपास सुरू केला होता. या तपासासाठी पोलिसांनी दफन केलेला मृतदेह दहा दिवसांनंतर कबरमधून बाहेर काढला आणि पोस्टमार्टमसाठी पुढे पाठवण्यात आला. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर हिरालालच्या मृत्यूमागील धक्कादायक कारणाचा उलगडा झाला. त्याआधारे पोलिसांनी हिरालालच्या पत्नीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली. तिने हत्याकांडामागील कारणाचा पोलिसांसमोर खुलासा केला. आरोपी महिलेचे तिच्या सासऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. यात हिरालालचा अडथळा येत होता. त्यामुळे सूनेसोबतच्या संबंधातील मुलाचा अडथळा कायमचा दूर करण्यासाठी हिरालालच्या हत्येचा कट रचला गेला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. (The father killed his son as he did not want to interfere in his immoral relationship with his daughter-in-law)

इतर बातम्या

चारित्र्याच्या संशयावरुन वकिल महिलेची हत्या; पतीला जन्मठेप, सासऱ्याला सक्तमजुरी

विनापास प्रवास करणाऱ्या क्रिकेटर पृथ्वी शॉला पोलिसांनी रोखलं, पास मिळाल्यानंतर तासाभराने मार्गस्थ

Non Stop LIVE Update
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.