विनापास प्रवास करणाऱ्या क्रिकेटर पृथ्वी शॉला पोलिसांनी रोखलं, पास मिळाल्यानंतर तासाभराने मार्गस्थ

प्रवासासाठी ई पासची अट घालण्यात आली आहे. या नियमाचा फटका भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ याला बसलाय.

विनापास प्रवास करणाऱ्या क्रिकेटर पृथ्वी शॉला पोलिसांनी रोखलं, पास मिळाल्यानंतर तासाभराने मार्गस्थ
Cricketer Pritvi shaw
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 11:01 PM

सिंधुदुर्ग : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं लागू केलेला लॉकडाऊन आता 1 जूनपर्यंत वाढवण्यात आलाय. या काळात प्रवासासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रवासासाठी ई पासची अट घालण्यात आली आहे. या नियमाचा फटका भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ याला बसलाय. पृथ्वी शॉ पास न काढताच कोल्हापूरमार्गे गोव्याकडे निघाला होता. त्यावेळी आंबोली इथं सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याला रोखलं आणि पासबाबत विचारणा केली. पण त्याच्याकडे पास नसल्यामुळे पोलिसांनी त्याला रोखून धरलं. अखेर ऑनलाईन पास काढल्यानंतर तासाभराने पृथ्वी शॉ गोव्याच्या दिशेने रवाना झाला. (Cricketer Prithvi Shawla was stopped by Sindhudurg police in Amboli)

ऑनलाईन पास मिळाल्यानंतर तासाभराने मार्गस्थ

भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याकडे निघाला होता. आंबोली परिसरात त्याची गाडी आल्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर पोलीसांनी त्याच्याकडे पासची विचारणा केली. तेव्हा पृथ्वी काहीसा गडबडला. आपण पास काढला नसल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. पास नसल्यामुळे पोलिसांनी तुला पुढे जाता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं. पृथ्वीने पोलिसांना विनवण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस आपल्या कर्तव्यापासून हटले नाहीत. शेवटी पृथ्वीने तिथूनच ऑनलाईन पाससाठी अर्ज केला. तासाभराने त्याच्या मोबाईलवर पास आल्यानंतर त्याने तो पोलिसांनी दाखवला आणि गोव्याकडे मार्गस्थ झाला.

पृथ्वी शॉ सुट्टीसाठी गोव्याला

कोरोनाच्या सावटामुळे आयपीएल स्पर्धा रद्द झाली आहे. आयपीएलमध्ये पृथ्वी दिल्लीच्या संघाकडून खेळतोय. पण आता स्पर्धाच रद्द झाल्यामुळे त्याने मित्रांसोबत गोव्याला जाणं पसंत केलं. मात्र, प्रवासासाठी पास काढला नसल्यामुळे आंबोलीमध्ये पोलिसांनी त्याला रोखलं. तेव्हा ऑनलाईन पाससाठी अर्ज केल्यानंतर तो तासभर तिथेच आपल्या गाडीमध्ये बसून राहिला.

सिंधुदुर्ग पोलिसांचं कौतुक

दरम्यान, ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. सामान्य माणूस आणि सेलिब्रिटी यांच्यासाठी कायदा समान असल्याचं पोलिसांनी दाखवून दिल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलीय. सिंधुदुर्ग पोलिसांनीही आम्हाला कायदा महत्वाचा असल्याचं म्हटलंय. त्यामुळे पृथ्वी शॉला पास नसल्यामुळे रोखण्यात आलं असं सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला, CCTV ने रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर

गडकरींनी करुन दाखवलं! वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमधून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

Cricketer Prithvi Shawla was stopped by Sindhudurg police in Amboli

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.