गडकरींनी करुन दाखवलं! वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमधून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

सागर जोशी

|

Updated on: May 13, 2021 | 7:41 PM

वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीतून रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर आला आहे.

गडकरींनी करुन दाखवलं! वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमधून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर
वर्ध्यातील कंपनीतीन रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर
Follow us

नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होतेय. अशावेळी रेमडेसिव्हीरचा तुटवडा आणि काळाबाजार होत असल्याचं राज्यात सर्वत्र पाहायला मिळालं. साधारण दीड हजार रुपये किमतीचं हे इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल 30 ते 40 हजारांना विकल्याच्या बातम्या आल्या. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीला रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवण्याची परवानगी मिळवून दिली. त्यानंतर आज या कंपनीतून इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर आला आहे. (first stock of remedivir injection from Genetic Life Sciences in Wardha)

नितीन गडकरी यांनी जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीतून रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पहिला स्टॉक बाहेर पडला आहे. एकूण `17 हजार इंजेक्शन वापरास सज्ज झाले आहेत. वर्धा इथं उप्तादित झालेले हे इंजेक्शन नागपूरसह राज्यभरात वितरीत केले जाणार आहेत. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका व्हर्च्युअल सभेत हे इंजेक्शन सुपुर्द करण्यात आले. वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत 5 मे रोजी रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात झाली होती.

नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने रेमडेसिव्हीरचे उत्पादन

दरम्यान काही दिवसापूर्वी राज्यातील रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिव्हीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिव्हीरचे उत्पादन करण्यात येत आहे. तसेच जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये 30 हजार इंजेक्शन्स बनवण्याचं लक्ष्य आहे. हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्सला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.

नितीन गडकरी यांचे रेमडेसिव्हीरसाठी प्रयत्न

महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते . कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती.

संबंधित बातम्या :

कोरोनाविरुद्धच्या लढाईची जबाबदारी गडकरींकडे देण्याची पुन्हा पुन्हा मागणी का? वाचा सविस्तर

राज्य सरकारकडून मुंबई महापालिकेला वेगळा आणि पुणे, नागपूर महापालिकेला वेगळा न्याय?

first stock of remedivir injection from Genetic Life Sciences in Wardha

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI