रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, पुण्यात नामांकित हॉस्पिटलच्या नर्सला बेड्या, मित्रालाही अटक

रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, पुण्यात नामांकित हॉस्पिटलच्या नर्सला बेड्या, मित्रालाही अटक
remdesivir

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. (Pune Nurse Black Market Remdesivir)

अनिश बेंद्रे

|

Apr 11, 2021 | 4:30 PM

पुणे : रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा (Remdesivir) काळाबाजार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या नर्सचाही समावेश आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही कारवाई करण्यात आली आहे. (Pune renowned Hospital Nurse and friend arrested for Black Market of Corona Injection Remdesivir)

बनावट ग्राहक पाठवून तरुणाला अटक

पृथ्वीराज मुळीक आणि नर्स नीलिमा घोडेकर अशी अटकेत असलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. भारती विद्यापीठ परिसरात एक व्यक्ती रेमडेसिव्हीर इंजेक्शन अधिक किमतीत विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अधिक किमती इंजेक्शन देताना पृथ्वीराज मुळीक याला अटक केली.

पुण्यातील हॉस्पिटलमधील नर्सलाही बेड्या

त्याच्याकडे केलेला अधिक चौकशीत त्याने हे इंजेक्शन त्याची मैत्रीण असलेल्या नीलिमा घोडेकर हिच्याकडून घेतल्याचे सांगितले. नीलिमा ही वाकड येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. त्यानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पोलिसांची दहा विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

नांदेडमध्येही कारवाई

नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जादा दराने रेमडेसिव्हीरची विक्री करणाऱ्या चौघा जणांना काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. त्यांच्याकडून सात इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली होती. मूळ किंमत कमी असताना रेमडेसिव्हीर इंजेक्शन तब्बल आठ हजार रुपयाला विक्री केले जात होते. पोलिस पथकाने वीरभद्र स्वामी, बाबा पडोळे, बालाजी धोंडे आणि विश्वजित कांबळे या आरोपींना ताब्यात घेतलं.

संबंधित बातम्या :

राज्यात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा, कुठे काळाबाजार, तर कुठे मेडिकलबाहेर रांगा

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार, आठ हजारांना विक्री, चौघांना अटक

(Pune renowned Hospital Nurse and friend arrested for Black Market of Corona Injection Remdesivir)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें