AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार, आठ हजारांना विक्री, चौघांना अटक

नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जादा दराने रेमडेसिव्हीरची विक्री करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. (Nanded Remdesivir injection black market)

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार, आठ हजारांना विक्री, चौघांना अटक
रेमडेसिविर इंजेक्शन
| Updated on: Apr 08, 2021 | 7:26 AM
Share

नांदेड : नांदेडमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. सध्या नांदेड जिल्ह्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची तातडीची गरज भासत आहे. जादा दराने रेमडेसिव्हीरची (Remdesivir) विक्री करणाऱ्या चौघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Nanded Police arrests four for Remdesivir injection black market)

नांदेडमध्ये रेमडेसिव्हीरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा अन्न आणि औषध प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र नांदेडमध्ये रेमडेसिव्हीरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा काळाबाजार उघड केला. स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जादा दराने रेमडेसिव्हीरची विक्री करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सात इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

बनावट ग्राहक पाठवून कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली. मूळ किंमत कमी असताना रेमडेसिव्हीर इंजेक्शन तब्बल आठ हजार रुपयाला विक्री केले जात होते. पोलिस पथकाने वीरभद्र स्वामी, बाबा पडोळे, बालाजी धोंडे आणि विश्वजित कांबळे या आरोपींना ताब्यात घेतलं.

हिंदुस्थान मेडिकल वाजेगाव आणि मनस्वी ऐजेसी संजीवनी हॉस्पिटल येथून हे चार आरोपी इंजेक्शन मिळवायचे आणि काळ्या बाजारात विक्री करायचे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यात मोठी साखळी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

दरम्यान, महाराष्ट्रात दर दिवसाला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असल्याने या सर्वांचा वापर होत आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्याशिवाय सर्व खाजगी डॉक्टरांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर हा टास्क फोर्सने घालून दिलेल्या नियमानुसार करा, असा सल्लाही राजेश टोपेंनी दिला आहे. (Nanded Police arrests four for Remdesivir injection black market)

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यासाठी प्रभावी पडत असलेले रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी मेडिकल दुकानाबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

नफेखोरीच्या भानगडीत पडू नका, फेअर नफा कमवा

राज्यात दर दिवशी 50 हजार रेमडेसिव्हीर मिळत आहे. या सर्वांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी केंद्राने मदत करावी. तसेच काही ठिकाणी गरज नसताना रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिले जात आहे, असं लक्षात आलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बिल वाढवण्यासाठी असं करु नका, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं.

संबंधित बातम्या :

राज्यात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा, कुठे काळाबाजार, तर कुठे मेडिकलबाहेर रांगा

महाराष्ट्राला दर दिवशी 50 हजार रेमडेसिव्हीरचा पुरवठा, केंद्राने इंजेक्शनसाठी मदत करावी : राजेश टोपे

(Nanded Police arrests four for Remdesivir injection black market)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.