महाराष्ट्राला दर दिवशी 50 हजार रेमडेसिव्हीरचा पुरवठा, केंद्राने इंजेक्शनसाठी मदत करावी : राजेश टोपे

खाजगी डॉक्टरांनी रेमडेसिव्हीरचा वापर टास्क फोर्सने घालून दिलेल्या नियमानुसार करा, असा सल्ला राजेश टोपेंनी दिला आहे. (Rajesh tope on Remdesivir injection Shortage)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:11 PM, 7 Apr 2021
महाराष्ट्राला दर दिवशी 50 हजार रेमडेसिव्हीरचा पुरवठा, केंद्राने इंजेक्शनसाठी मदत करावी : राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्रात दर दिवसाला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असल्याने या सर्वांचा वापर होत आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्याशिवाय सर्व खाजगी डॉक्टरांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर हा टास्क फोर्सने घालून दिलेल्या नियमानुसार करा, असा सल्लाही राजेश टोपेंनी दिला आहे. (Rajesh tope on Remdesivir injection Shortage)

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यासाठी प्रभावी पडत असलेले रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी मेडिकल दुकानाबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

नफेखोरीच्या भानगडीत पडू नका, फेअर नफा कमवा

राज्यात दर दिवशी 50 हजार रेमडेसिव्हीर मिळत आहे. या सर्वांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी केंद्राने मदत करावी. तसेच काही ठिकाणी गरज नसताना रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिले जात आहे, असं लक्षात आलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बिल वाढवण्यासाठी असं करु नका. महाराष्ट्राला दर दिवशी 50 हजार रेमडेसिव्हीरचा पुरवठा, केंद्राने इंजेक्शनसाठी मदत करावी : राजेश टोपे

काही ठिकाणी रेमडेसिव्हीरचा भाव 3 ते 4 हजार रुपये केला जात आहे. ते इंजेक्शन 1100 ते 1400 च्या वर विकू नका, असं ठरवलं होतं. पण त्याचं पालन केलं जात नसल्याचं दिसून आलं. यासाठी आम्ही एक समिती नेमली आहे ती रेमडेसिव्हीर इंजेक्शनची योग्य ती किंमत ठरवेल. त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नफेखोरीच्या भानगडीत पडू नका, फेअर नफा कमवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे.

केंद्राकडून आम्हाला काही अपेक्षा

दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याबरोबर देशातील 9 राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची व्हिसी झाली. केंद्र सरकारच्या नियमावलींचे तंतोतंत पालन करणारे महाराष्ट्र अग्रभागी असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. अनेक व्यापाऱ्यांचा विरोध पत्करुन आम्ही कोरोना रोखण्यासाठी जे जे करायचं ते केलं आहे. केंद्राच्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या आहेत. पण केंद्राकडून आम्हाला काही अपेक्षा आहेत, असेही राजेश टोपे म्हणाले.

“आम्ही 3 लाख लोकांचे दररोज लसीकरण करत आहोतं. ते 6 लाख करा असं सांगितलं होतं. आज आम्ही साडेचार लाखापर्यंत पोहोचलो. पण लस नाही म्हणून आम्हाला काही लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. अनेक केंद्रावरुन लस नाही म्हणून लोकांना आम्ही परत पाठवत आहोत. त्यामुळे लसीचा पुरवठा करा अशी मागणी आम्ही वारंवार केंद्राकडे करत आहोत,” असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतात

आम्ही लसीकरणासाठी गावा गावात टीम पाठवत आहोत. तशी यंत्रणा आम्ही उभी केली आहे. पण आम्हाला लस मिळत नाही. काल मी कळकळीची विनंती केली आम्हाला लस लवकर द्या. सर्वात जास्त फिरणारा वर्ग 20 ते 40 या  वयोगटातील आहे. त्यामुळे हे लोक जास्त कोरोनाग्रस्त झाल्याचं दिसतं आहेत. त्यामुळे 18 च्या वर्षाच्या पुढे सर्वांचे लसीकरण करायची मागणी केली आहे. इतर राज्यात नंतर करा, पण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतायत त्यामुळे इथे आधी द्या, असेही राजेश टोपेंनी सांगितले.

राज्यात 1200 मेट्रीक टन ऑक्सिजन तयार होतो. त्यात 700 मेट्रीक टन लागतो. ऑक्सिजनची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करा अशी मागणी केली आहे, असेही राजेश टोपे म्हणाले. (Rajesh tope on Remdesivir injection Shortage)

संबंधित बातम्या : 

राज्यात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा, कुठे काळाबाजार, तर कुठे मेडिकलबाहेर रांगा