पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला, CCTV ने रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर

पुण्यात दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला, CCTV ने रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर
पुणे कोरोना पॉझिटिव्ह बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 6:50 PM

पुणे : पुण्यात दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह आज सकाळी आढळला. ही महिला भवानी पेठेतील होप हॉस्पिटलमधून बेपत्ता झाली होती. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. मात्र आज हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या महिलेचा मृतदेह मिळून आला. बायमाबी कमरुद्दीन तांबोळी असं मृत महिलेचं नावं आहे.

ही महिला हॉस्पिटलमधून बेपत्ता होतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. खाजगी रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह महिला पळून जातेचं कशी? हॉस्पिटलमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

नेमकं प्रकरण काय? 

बायमाबी  तांबोळी या महिलेला कोरोनाची लक्षणे होती. त्यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर पुण्यातील भवानी पेठेतील होप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र दोन दिवसापूर्वी त्या अचानक रुग्णालयातून बेपत्ता झाल्या होत्या. उपचार सुरु असताना बायमाबी तांबोळी नेमक्या कुठे गेल्या, याचा पत्ता कुणालाच नव्हता. शेवटी त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली. मात्र बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनी म्हणजे आज त्यांचा थेट मृतदेहच आढळला.

CCTV मध्ये नेमकं काय? 

दरम्यान, बायमाबी तांबोळी बेपत्ता झाल्यानंतर रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये बायमाबी या धडपडत चालताना दिसत आहेत. चाचपडत चालताना त्यांनी बाजूला असलेल्या गाडीला हात लावून तोल सांभाळला. त्यानंतर पुढे जाऊन त्या जागेवरच बसल्या.

बायमाबी या अचानक खाली बसल्याने बाजूला असलेल्या व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी धावतो. तो त्यांना आधार देऊन रस्ता क्रॉस करण्यास मदत करतो. बायमाबी या त्या व्यक्तीचा आधार घेऊन चालत जातात आणि रस्ता क्रॉस करतात.

संबंधित बातम्या 

शाब्बास रे पठ्ठ्या ! पुणेकराकडून 14 वेळा प्लाझ्माचे दान…      

RT-PCR चाचणी म्हणजे काय ? चाचणी कशी केली जाते ?, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.