शाब्बास रे पठ्ठ्या ! पुणेकराकडून 14 वेळा प्लाझ्माचे दान…

अजय मुनोत यांनी 7 मे 2021 रोजी 14 वं प्लाझ्मा दान केलंय. Ajay Munot plasma donate

शाब्बास रे पठ्ठ्या ! पुणेकराकडून 14 वेळा प्लाझ्माचे दान...
अजय मुनोत
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 5:58 PM

पुणे: रक्तदान म्हंटलं की अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतात. पण, काही जण पॅशन म्हणून रक्तदान करतात. सामान्य काळात अशी स्थिती असते. कोरोनासारख्या महामारीमध्ये तर प्लाझ्मादान म्हंटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण पुण्याच्या अजय मुनोत यांचं तसं नाही. मुनोत यांनी आतापर्यंत 14 वेळा प्लाझ्मादान केलं आहे. 15 व्या वेळा प्लाझ्मादान करण्यासाठी ते तयार आहेत. (Ajay Munot citizen of Pune plasma donate fourteen times and now ready for fifteen)

पुणे तिथं काय उणं असं गंमतीनं म्हणतो पण..

पुणे तिथं काय उणं असं गंमतीनं आणि काहीशा अभिमानानंही म्हणतात…काही तरी अफलातून करावं असा पुणेकरांचा नेहमीच प्रयत्न असतो..बरं हे आत्ताच नाही तर याला चांगलाच इतिहाससुद्धा आहे. या इतिहासाला साजेसा पराक्रम अजय मुनोत या 50 वर्षीय पुणेकरानं केलाय..अजय मुनोत यांना गेल्या जूनमध्ये कोरोना झाला होता आणि 10-12 दिवसांत ते कोरोनातून बरेही झाले.

मुनोत हे व्यवसायानं स्ट्रॅटेजिक कन्सल्टंट आहेत. आपल्या प्लाझ्मादानाची स्टोरीच त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितली. हे सारं जूनमध्ये सुरु झालं..मला कोरोना झाला आणि उपचाराने मी बराही झालो. बरा झाल्यानंतर सगळीकडं प्लाझ्मा हवा, प्लाझ्मा हवा अशी मागणी होत असल्याचं मी पाहिलं. सोशल मीडियावर असे खूप मेसेज फिरत होते. असंच एक कुटुंब प्लाज्माच्या शोधात होतं. त्यांच्या रुग्णासाठी मी पहिल्यांदा म्हणजे 26 ऑगस्टला प्लाझ्मा दान केलं. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी दोन वेळा प्लाझ्मा दान केले. डिसेंबर आणि जानेवारीत प्रत्येकी एक वेळा तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये प्रत्येकी तीनवेळा मुनोत यांनी प्लाझ्मा दान केलंय. 7 मे रोजी त्यांनी 14 व्यांदा प्लाझ्मा दिला.

अजय मुनोत यांनी दिले एका आईला जीवदान

टिंगरेनगरमधले पंकज सोनावणे त्यांची 63 वर्षांची आई जहांगीर हॉस्पिटलमध्ये खूप गंभीर होती. त्यांची फुफ्फुसं खूपच खराब झाली होती. पंकज हे प्लाझ्मादात्याच्या शोधात होते. ऑगस्टमधली ही घटना..पंकज यांनी सर्व रक्तपेढ्यांना भेट दिली, पण कुठेच प्लाझ्मा मिळाला नाही. काही रक्तदात्यांकडे त्यांनी संपर्क साधला, पण त्यांनीही आधी हो म्हंटलं आणि त्यानंतर काही तरी कारण देऊन माघार घेतली. यामध्ये तीन दिवस गेले. अशी शोधाशोध सुरु असतानाच चौथ्या दिवशी पंकज यांना पुणे पोलीस आयुक्तालयामधून अजय मुनोत यांचा नंबर मिळाला. स्वतः मुनोत यांनीच पोलिसांना आपला नंबर देऊन कुणाला प्लाझ्माची गरज असेल तर कॉल करा म्हणून सांगितलं होतं. चौथ्या दिवशी अजय मुनोत यांनी दुसरं प्लाझ्मा दान करुन पंकज सोनावणेंच्या आईचे प्राण वाचवले. अजय मुनोत पुढे आले नसते तर माझी आई वाचू शकली नसती असे सद्गदित करणारे उद्गार पंकज यांनी काढले.

“प्लाझ्मादानासंबंधीचे गैरसमज दूर करणार”

अजय मुनोत यांनी 7 मे 2021 रोजी 14 वं प्लाझ्मा दान केलंय. प्लाझ्मा दान केल्यानं अशक्तपणा येतो ही रक्तदात्यांमधली भीती दूर करण्यासाठी मी वारंवार प्लाझ्मा दान करत राहिलो असं मुनोत म्हणतात. मी 14 वेळा प्लाझ्मा दान केले, एकाही दिवशी मला अशक्तपणा किंवा अस्वस्थता जाणवली नाही. पण एखाद्याला तो येऊही शकेल असंही मुनोत म्हणाले. प्लाझ्मा घेताना रक्तही घेतात असा एक गैरसमज आहे, त्यात अजिबात तथ्य नाही असं मुनोत यांनी सांगितलं. प्लाझ्मा आणि रक्त वेगळं असतं. प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात. प्लाझ्मा देणं म्हणजे रक्तदान करणं नव्हे अशीही माहिती मुनोत यांनी दिली. मी आधी अँटीबॉडी टेस्ट करुन घेतली, आज 9 महिन्यांनंतरसुद्धा माझ्या रक्तात अँटीबॉडीज आहेत, त्यामुळं 15 व्या वेळीही मी प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार आहे अशी हिंमत मुनोत यांनी दाखवली.

सारे प्लाझ्मादान सह्याद्री हॉस्पिटलमध्ये !

मी माझे सारे प्लाझ्मा पुण्यातल्या कोथरुडमधल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये केलेत असं अजय मुनोत यांनी सांगितलं. सह्याद्री हॉस्पिटलमधल्या डॉ. पूर्णिमा राव यांनीसुद्धा अजय मुनोत यांच्या 14 प्लाझ्मादानाची पुष्टी करुन प्लाझ्मादात्याला कसलाही धोका नाही असं सांगितलं. उलट प्लाझ्मा दानामुळं हाडांचे कार्य वाढते, हाडांमधले स्पंजसारखे टिश्यू नव्या पांढऱ्या, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स तयार करतात असंही डॉ. पूर्णिमा राव म्हणाल्या.

प्लाझ्मादानाचा राष्ट्रीय विक्रम

अजय मुनोत यांच्या या प्लाझ्मादानाचा राष्ट्रीय विक्रम बनलाय. सर्वाधिक 14 प्लाझ्मादानाचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदलाय. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं त्यांच्या या विक्रमावर शिक्कोमोर्तब करुन प्रमाणपत्रही बहाल केलंय. हे प्रमाणपत्र एखाद्या पदकासारखं ते अभिमानानं दाखवत आहेत. समाजात राहून समाजाला काही तरी देणं लागतो, या भावनेनं मुनोत यांनी प्लाझ्मादान केलं, हे खूपच कौतुकास्पद आहे. कोरोनाकाळात जन्माला घातलेली पोरंही दूर जात असल्याच्या कटु बातम्या वाचयला-पाहायला मिळाल्या. मुनोत यांची ही भावना आणि प्रयत्न खूपच दिलासा देणारे आहेत.

संबंधित बातम्या:

‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा देणार, अजित पवारांची घोषणा

…तरच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करा; पुण्यातील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश

(Ajay Munot citizen of Pune plasma donate fourteen times and now ready for fifteen)

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.