AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तरच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करा; पुण्यातील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश

या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णालयाचा रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा रोखण्यात येईल | remdesivir injection

...तरच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करा; पुण्यातील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश
remdesivir injection
| Updated on: May 11, 2021 | 8:20 AM
Share

पुणे: रेमडेसिविर इंजेक्शनच्या अतिवापरामुळे कोरोना रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या पाहता आता पुण्यातील  रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णाला (Coronavirus) अगदीच गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे नसतील किंवा त्याला रेमडेसिविरची एलर्जी असेल तर त्यांना इंजेक्शन देऊ नये. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणि एखादा अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठीही रेमडेसिविरचा वापर टाळावा, अशा पुणे (Pune) सूचना देण्यात आल्या आहेत.  (Pune Mahanagarpalika preparation for coronavirus third wave)

याशिवाय, कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन देऊ नये. गरजू रुग्णांनाच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जावे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णालयाचा रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा रोखण्यात येईल, असा इशाराही पुणे महानगरपालिकेने दिला आहे.

पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी, ‘बालरोग तज्ज्ञां’चा टास्क फोर्स स्थापन होणार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना विषाणूची लागण होण्याचा धोका ओळखून पुणे महानगरपालिकेने युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी आता ‘बालरोग तज्ज्ञां’चा टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे.येरवाडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लहान मुलांसाठी 50 बेडचा स्वतंत्र कक्ष उभारण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी निधी दिला आहे.

तर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयांना बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधा निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. लहान मुले कोरोनाने बाधित झाल्यास त्यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र केंद्र तयार करण्याबाबत विचार करावा. तसेच कोविडनंतर उद्भवणाऱ्या आजाराबाबतही दक्ष राहावे, असे सौरभ राव यांनी सांगितले.

सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरच्या वापराबाबत पालकांनी बालकांमध्ये जागृती करावी. कोरोनामुळे निर्माण झालेला ताण तणाव व भीती दूर करण्यासाठी मनसोपचार तज्ञ, स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

पुण्यातील लॉकडाऊन अधिक कडक होणार, दुपारी 12 नंतर प्रत्येक वाहनाची कडक तपासणी

(Pune Mahanagarpalika preparation for coronavirus third wave)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.