14 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी, लॉजवर नेऊन 5 तरुणांचा बलात्कार

14 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लिल फोटो काढून तेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 तरुणांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील ही घटना आहे.

14 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी, लॉजवर नेऊन 5 तरुणांचा बलात्कार
आळेफाटा पोलिस स्टेशन

पुणे (जुन्नर ) : 14 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लिल फोटो काढून तेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 तरुणांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील ही घटना आहे. आळेफाटा पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.  (14 year old girl falls in love, threatens pornographic photos viral, 5 youths raped a girl in Aalephata Junnar pune)

अल्पवयीन मुलीवर 5 तरुणांचा वारंवार बलात्कार

सविस्तर माहिती अशी की, आळेफाटा येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणीने तिचे अश्लील फोटो काढले. हेच फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून लॉजवर जाऊन तसंच वेगवेगळ्या ठिकाणी अनेकवेळा पाच तरुणांनी बलात्कार केला. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत तसेच आरोपींकडून वापरली जाणारे वाहन आळेफाटा पोलिसांनी जप्त केले आहे.

पाचही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या

हे सगळेच आरोपी पिपरीपेंढार व आळे येथील आहे. यामधे निखिल पोटे (वय 20) विकी पोटे (वय 20 ) बंटी तितर (वय 20) दया टेमगिरे , यश गाडेकर (वय 20) अशी आरोपींची नावे आहेत. या सगळ्या आरोपींना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींविरोधात भा. दं. वि. 376 (ड) (अ) 504 , 506 , तसेच बाल लैंगिक अ. स. अधिनियमनन 2012 सुधारणा 2019 चे कलम 4, 5,(ग) (ल) 6 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

आज कोर्टात हजर करणार

अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले असल्याने सदरचे व्हिडीओ व्हायरल करण्याच्या भीतीने फेब्रुवारीपासून ते आजतागायत या मुलीला चारचाकी वाहनामधून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर संबंधित 5 तरुणांनी अनेकवेळा बलात्कार केला. या सर्व आरोपींना आज खेड येथील सत्र न्यायालयात दुपारी 12 वाजता नेण्यात येणार आहे.

(14 year old girl falls in love, threatens pornographic photos viral, 5 youths raped a girl in Aalephata Junnar pune)

हे ही वाचा :

वसईच्या तहसील कार्यालयात हिंदी साप्ताहिकाच्या पत्रकाराचा धुडगूस, महत्त्वाची कागदपत्रं फाडली

खबऱ्याने माहिती दिली, कर्जत पोलिसांनी ट्रॅप लावला, दूध भेसळीची लाखो रुपयांची पावडर जप्त!

सीबीआयच्या हाती सुपारी व्यापाऱ्यांची जंत्री, संत्रीनगरीत छापेमारी, 15 हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI