खबऱ्याने माहिती दिली, कर्जत पोलिसांनी ट्रॅप लावला, दूध भेसळीची लाखो रुपयांची पावडर जप्त!

कर्जत पोलिसांची (Karjat Police) मोठी कारवाई केलीये. दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी लाखोंची पावडर जप्त करण्यात आलीये. (Karjat Police Action against those who adulterate milk)

खबऱ्याने माहिती दिली, कर्जत पोलिसांनी ट्रॅप लावला, दूध भेसळीची लाखो रुपयांची पावडर जप्त!
कर्जत पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 9:11 AM

अहमदनगर :  कर्जत पोलिसांची (Karjat Police) मोठी कारवाई केलीये. दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी लाखोंची पावडर जप्त करण्यात आलीये. पावडरची वाहतूक करताना वाहनासह 4 लाख 28 हजार रुपयांचा माल जप्त केलाय. (Karjat Police Action against those who adulterate milk)

कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. खेड गावच्या दिशेने एक स्विफ्ट कार येत असून त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर आहे. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही धडक कारवाई केलीये.

ती पावडर घरी जाऊन दुधात पाणी, पावडर व इतर साहित्य टाकून दुधात भेसळ करणार होते, मात्र पोलिसांनी त्वरित कारवाई केल्याने पुढचा अनर्थ टळला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

खबऱ्याने माहिती दिली

खेड गावचे दिशेने एक स्विफ्ट कार येत असून त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर आहे आणि ती पावडर घरी जाऊन दुधात पाणी, पावडर व इतर साहित्य टाकून दुधात भेसळ करणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,पोलीस हवालदार महादेव गाडे, यांना सांगून सदर ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करा असे आदेशित केल्याने वरील पोलीस स्टाफ तात्काळ पोलीस स्टेशन येथून खाजगी वाहनाने रवाना झाले.

पोलिसांनी ट्रॅप लावला

खेड गावचे शिवारात एक स्विफ्ट आली असताना त्यास पोलिसांनी थांबवून त्यातील इसमाकडे त्यांच्या नावाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे असिफ गफूर शेख, वय 22 वर्ष, 2) अरबाज हसन शेख, वय 22 वर्ष, (दोन्ही रा मुसलमान वस्ती, दूरगाव, ता. कर्जत) असे असल्याचे सांगितले. पोलीस स्टाफने सदर वाहनाची झडती घेतली असता गाडीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडरच्या 25 किलो वजनाच्या 8 गोण्या व प्रत्येक गोणीची किंमत 3500 रुपये प्रमाणे 28,000 रु किमतीच्या असलेली दिसल्या.

आरोपींनी गुन्हा कबूल केला…!

त्यावेळी पोलिसांनी वरील इसम यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही ही पावडर दुधात भेसळ करण्यासाठी आमचे दूरगाव गावी चाललो होतो. त्यावेळी पोलिसांची खात्री झाली की सदरची पावडर ही दुधात भेसळ करण्यासाठी घेऊन जात होते. आरोपींनी त्यांच्या घरी सदरची भेसळ कशी केली जाते याबाबत प्रक्रिया करून दाखविली. पोलिसांनी वरील दोन इसमांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नं 694/2021 भा दं वि कलम 272/ 273 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून कोर्टाच्या परवानगीने पुढील तपास पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते हे करीत आहेत. लाखोंची माल जप्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

सीबीआयच्या हाती सुपारी व्यापाऱ्यांची जंत्री, संत्रीनगरीत छापेमारी, 15 हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय

गोठ्यात आणि कारमध्ये लाखोंची बनावट दारू लपवली, पोलिसांना खबर लागली आणि…

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.