AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोठ्यात आणि कारमध्ये लाखोंची बनावट दारू लपवली, पोलिसांना खबर लागली आणि…

गुहागर तालुक्यातील नरवण आणि बोऱ्या येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे (Huge stock of spurious liquor seized from state excise duty in Ratnagiri).

गोठ्यात आणि कारमध्ये लाखोंची बनावट दारू लपवली, पोलिसांना खबर लागली आणि...
गोठ्यात आणि कारमध्ये लाखोंची बनावट दारू लपवली, पोलिसांना खबर लागली आणि.....
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 01, 2021 | 6:45 PM
Share

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील नरवण आणि बोऱ्या येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 47 हजार 560 रूपये किंमतीचा गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी गोठ्यात आणि नंबरप्लेट नसलेल्या कारमध्ये अवैध दारुचा साठा ठेवला होता (Huge stock of spurious liquor seized from state excise duty in Ratnagiri).

राज्य उत्पादन शुल्काने कारवाई नेमकी कशी केली?

गुहागर तालुक्याती नरवण येथे एकाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा केला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण आणि भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी नरवण येथून गोवा बनावट गोल्डन एम व्होरकीचे 25 बॉक्स, महाराष्ट्र बनावटीच्या मद्याचा 1 बॉक्स, 180 लीटर गावठी दारू आणि 1 नंबरप्लेट नसलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 6 लाख 82 हजार 976 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला.

घरात आणि कारमध्ये दारूच्या बाटल्या

याप्रकरणी आरोपी नितेश दिनेश आरेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश याने गोवा बनावट मद्याचे काही बॉक्स घराजवळ असलेल्या गोठ्यात तर गावठी दारू आणि काही बॉक्स स्विफ्ट डिझायर कारमध्ये ठेवले होते (Huge stock of spurious liquor seized from state excise duty in Ratnagiri).

दुसरी कारवाई बोऱ्यामध्ये

या कारवाईनंतर उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी बोऱ्या येथे कारवाई करून गोल्डन एस व्हीस्कीचे 2 बॉक्ससह मॅक्डॉल नं 1 व्हिस्की, हायवर्ड्स व्हिस्की, डिएसपी ब्लॅक असा एकूण 64 हजार 584 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुप्रिया संदेश ठाकूर हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित कारवाई निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, किरण पाटील, स.दु.नि विजय हातीसकर, जवान सागर पवार, दत्तप्रसाद कालेलकर, विशाल विचारे, महिला जवान अनिता नागरगोजे यांनी केली. पुढील तपास निरीक्षक शरद जाधव आणि दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत. तसेच अशात पद्धतीने गोवा बनावट आणि गावठी दारू धंद्यावर कारवाया सुरू राहील, असा इशारा प्र.अधिक्षक वैभव वैद्य यांनी दिला.

हेही वाचा : जिममधली ठसन, भर रात्री नांदेडच्या चौकात दोन गट भिडले, प्रचंड नासधूस, लाखोंचं नुकसान, 250 जणांवर गुन्हा

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...