जिममधली ठसन, भर रात्री नांदेडच्या चौकात दोन गट भिडले, प्रचंड नासधूस, लाखोंचं नुकसान, 250 जणांवर गुन्हा

राजीव गिरी

| Edited By: |

Updated on: Jul 01, 2021 | 4:42 PM

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील आर. के. जिममध्ये दोन युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर शहरातील मारोती मंदिर चौकात दोन गटात तुफान दगडफेक झाली (clash between two group for trivial reasons in Nanded).

जिममधली ठसन, भर रात्री नांदेडच्या चौकात दोन गट भिडले, प्रचंड नासधूस, लाखोंचं नुकसान, 250 जणांवर गुन्हा
जिममधली ठसन, भर रात्री नांदेडच्या चौकात दोन गट भिडले, प्रचंड नासधूस, लाखोंचं नुकसान, 250 जणांवर गुन्हा
Follow us

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील आर. के. जिममध्ये दोन युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर शहरातील मारोती मंदिर चौकात दोन गटात तुफान दगडफेक झाली. यावेळी मोठ्या पोलिसांच्या गाडीसह मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि दोनचाकी वाहनाचे नुकसान झाले. यात 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटातील 200 ते 250 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे. अठरा जणांना ताब्यात घेण्यात आलंय. रात्री उशिरा झालेल्या या राड्यानंतर आज दिवसभर पोलिसांनी शोध मोहीम राबवत आरोपींना अटक करण्याचे सत्रच सुरू ठेवलंय (clash between two group for trivial reasons in Nanded).

पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर

शहरातील दोन युवकांच्या वादावादीनंतर दोन्ही गटातील जमावामध्ये राडा झाला. दिसेल त्या वाहनांची आणि दुकानाची, पानटपरी, दवाखाना, मेडिकलची देखील तोडफोड करण्यात आली. तसेच यावेळी भीषण दगडफेक झाली. यावेळी अनेक पोलीसही किरकोळ जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराची नळकांडी फोडावी लागली (clash between two group for trivial reasons in Nanded).

अडीचशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल

रात्री उशिरा दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दगडफेक सुरू झाली. जमाव हिंसक बनत असल्याचे लक्षात येताच अर्धापूर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आतापर्यंत 18 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस महानिरीक्षकासह पोलीस अधिकाऱ्यांची भेट

अर्धापूर शहरातील दोन गटात तुफान राडा झाला आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी भेट दिली. तातडीने अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, सहा.पोलीस निरीक्षक आर. टी. नांदगावकर, उपनिरीक्षक कपिल आगलावे, साईनाथ सुरवसे के.के.मागूळकर, महेंद्र डांगे, विद्यासागर वैद्य, बाबुराव जाधव, राजेश वरणे, कल्याण पांडे, संजय घोरपडे यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित घटनेमुळे प्रचंड नुकसान

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

अनिल देशमुख यांच्या दोन्ही सचिवांच्या ईडी कोठडीत वाढ, पालांडे, कुंदन आणि वाझे यांची समोरासमोर चौकशी होणार

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI