Girl committed suicided| शिक्षणासाठी वडिलांनी थांबवल्याच्या रागातून 24 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडीमारत केली आत्महत्या

| Updated on: Dec 22, 2021 | 11:17 AM

नम्रता हिचे ‘बीटेक’ (आयटी)पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तिच्यापेक्षा लहान भावाला नोकरी लागल्याने सहा महिन्यापूर्वी वसईकर कुटुंबिय वाकड येथे स्थायिक झाले. तिचे वडील चर्मकार असूनचपला व बूट पॉलिश करतात तर आई गृहिणी आहे. बीटेक नंतर नम्रताला साॅफ्टवेअरमधील काही ‘लॅंग्वेज’ नी शिकायच्या होत्या, त्यासाठीचा खर्च पेलने कुटुंबियांना शक्य नव्हते.

Girl committed suicided| शिक्षणासाठी वडिलांनी थांबवल्याच्या रागातून 24 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडीमारत केली आत्महत्या
girl suicided
Follow us on

पिंपरी – शहरातील वाकड परिसरात एक उच्चशिक्षित तरुणीने चार मजली इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नम्रता गोकुळ वसईकर (वय 24, रा. नंदनवन कॅालनी, माऊली चौक, वाकड) असेही मृत तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या आत्महत्येने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

अशी घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत नम्रता गोकुळ वसईकर हे सकाळी पावणेसहाच्या सुमारास घरातून बाहेर पडली. माऊली चौकातील एका चार मजली इमारतीच्या छतावर गेली. तिने आपलया चेहऱ्याला स्कार्फ बांधत छतावरून उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागला. याबाबत एका अनोळखी व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला, माहिती दिल्यानंतर पोलीस तातडीने घटना स्थळावरहजर होता तिला वायासीएम रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीचा तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याचा दरम्यान नम्रता घरी न पोहचल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. तरीही न सापडल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेले, त्यांनी तिथे नम्रताचा फोटो दाखवला, तेव्हा पोलिसांनी संबधित घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. या घटनेचा मोठा धक्का कुटुंबियांना बसला आहे.

आत्महत्येचे नेमके कारण काय?

मृत नम्रता हिचे ‘बीटेक’ (आयटी)पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तिच्यापेक्षा लहान भावाला नोकरी लागल्याने सहा महिन्यापूर्वी वसईकर कुटुंबिय वाकड येथे स्थायिक झाले. तिचे वडील चर्मकार असूनचपला व बूट पॉलिश करतात तर आई गृहिणी आहे. बीटेक नंतर नम्रताला साॅफ्टवेअरमधील काही ‘लॅंग्वेज’ नी शिकायच्या होत्या, त्यासाठीचा खर्च पेलने कुटुंबियांना शक्य नव्हते. मात्र बीटेकच्या शिक्षणावर तिला नोकरी मिळू असती मात्र पुढे शिकता येत नसल्याच्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.

Sanjay Raut on UP election| उत्तर प्रदेशातून गंगा उलटी वाहणार…शेतकऱ्यांसमोर शरणागती पत्करली तसेच मिश्रांबाबत होणार, राऊतांचा घणाघात…

Asian Champions Trophy hockey: सेमीफायनलमध्ये भारताला जपानकडून पराभवाचा धक्का, आज पाकिस्तान विरुद्ध सामना

तुरीची आवक सुरु होताच केंद्र सरकारचा मोठा निर्णय, काय होणार दरावर परिणाम?