AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीत कोसळली, कार चालकाचा बुडून मृत्यू

राहुल पठाडे हा तरुण आपल्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो केटेन कारने शिरुरकडून मलठणकडे जात होता. मात्र येवले माथा येथून पुन्हा तो मागे वळून शिरुरकडे चालला होता. यावेळी ऊसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीत कोसळली, कार चालकाचा बुडून मृत्यू
पुण्यात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळलीImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 06, 2023 | 9:00 PM
Share

शिरूर/पुणे, सुनील थिगळे (प्रतिनिधी) : कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीत जाऊन कोसळल्याची दुर्घटना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथे घडली आहे. या दुर्घटनेत चालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहुल गोपीनाथ पठाडे असं मृत कार चालकाचे नाव आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने कारसह चालकाचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. ऊसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडली. मयत चालक हा अहमदनगरमधील रहिवासी आहे.

शिरुरकडून मलठणकडे चालला होता तरुण

राहुल पठाडे हा तरुण आपल्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो केटेन कारने शिरुरकडून मलठणकडे जात होता. मात्र येवले माथा येथून पुन्हा तो मागे वळून शिरुरकडे चालला होता. यावेळी ऊसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

कार अनियंत्रित झाल्याने विहिरीत पडली

अनियंत्रित कार रस्त्याच्या सोडून 15 फूट लांब असलेल्या विहिरीत पडली. यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली.

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कठडे नसलेल्या धोकादायक विहिरी आहेत. यामुळे विहिरीत पडून मृत्यू होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. याबाबत विहीर मालकासह सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय